शिक्षक सहकार संघटना महाराष्ट्र राज्य, चंद्रपूर यांच्या मार्फत जिल्हा गुणवंत शिक्षक, राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कार

अन्य

जिल्हा प्रतिनिधी:मोहम्मद नासिर चंद्रपुर

शिक्षक सहकार संघटना महाराष्ट्र राज्य, चंद्रपूर यांच्या मार्फत जिल्हा गुणवंत शिक्षक, राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कार व शिक्षक – शिक्षण विशेषांक प्रकाशन सोहळा कार्यक्रमास उपस्थित होतो. यावेळी पुरस्कार प्राप्त शिक्षकांना शुभेच्छा दिल्यात. देशाच्या भावी पिढीला सुजाण व जबाबदार नागरिक बनवणाऱ्या व देशाच्या विकासात महत्त्वाचे योगदान देणाऱ्या शिक्षकांचा यावेळी गौरव करण्यात आला. देशाचा खरा शिल्पकार शिक्षक असून देशाला बदलण्याची ताकत शिक्षकांच्या हातात आहे.

CLICK TO SHARE