एड.इब्राहीम बख्श एक प्रभावी आणि मनमोहक सूत्र संचालन करणारे व्यक्तिमत्व-नामदार सुधीर मुनगंटीवार

अन्य

हिंगणघाट:ब्यूरो

वर्धा-सूत्र संचालनची कला ही ईश्वरीय देन आहे. त्याचे शैलीदार प्रस्तुतीकरण करता येणे हे त्या कलेचा कळस गाठणे होय. काव्य, शायरी आणि विचाराचे माध्यमाने मार्दव, आवेग, दुःखवेग आणि इतरही संवेदनशील भावना शब्दोचारण करून आणि मनभावक लयेतून एड. बख्श लोकांचे ह्रदयात जागा निर्माण करतात. तसेच प्रभावी आणि दर्जेदार सूत्र संचालनची कला मध्ये ते पारंगत आहेत. असे प्रतिपादन वन व सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केले.वर्धा येथिल क्रीडा संकुल मध्ये आमदार डॉ. पंकज भोयर यांचे जन्मदिवसाचे प्रसंगी आयोजित एका कार्यक्रमात एड. इब्राहीम बख्श यांच्या सत्कार प्रसंगी त्यांनी मनोगत व्यक्त केले. या प्रसंगी मंचावर खासदार रामदास तडस, आमदार डॉ. पंकज भोयर, आमदार समीर कुणावर, सीआयडी फेम व फिल्म कलाकार दया शेट्टी, जिला भाजपा अध्यक्ष मिलिंद गफाट, मिलिंद भेंडे व मान्यवर उपस्थित होते. “कार्यक्रम सूत्रबद्ध पद्धतीने यशस्वी करणे ये सूत्रसंचालन करणाऱ्या च्या वकाबदार शैली वर अवलंबून असते. आणि एड. इब्राहीम बख्श हे त्या शैलीत पारंगत आहे.” असे उद्गार खासदार रामदास तडस यांनी व्यक्त केले.” “सूत्र संचालन व निवेदनाच्या खुसखुशीत शैली मुळे त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आणि ही आमच्या साठी अभिमानाची बाब असल्याचे गौरव उद्गार आमदार समीर कुनावार यांनी व्यक्त केले.आपल्या यशा साठी एड. बख्श यांनी त्यांचे साहित्यिक गुरू इमरान राही यांना श्रेय दिले. तसेच नेहमी प्रोत्साहन देणारे आमदार डॉ. पंकज भोयर, मोहन बाबू अग्रवाल, एड. फिरदौस मिर्झा, न्यायमूर्ती अरुण चौधरी, एड. असद खान यांचेही योगदाना बद्दल एड. इब्राहीम बख्श ने त्यांचे बद्दल कृतज्ञता व्यक्त केली. एड. बख्श यांचे एड. जाहिद अली, एड. अस्मिता मुंगल, एड. राहत पटेल, एड. अस्मिता तपासे, डॉ. मदन इंगले, महेश वासु, शांतिलाल कोचर, गुड्डू शर्मा, मुकुंद सांगानी, संजय कासवा सहित अनेकांनी अभिनंदन केले.

CLICK TO SHARE