कृबासमध्ये लाल मिरची खरेदीचा शुभारंभ

अन्य

प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर

चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या रामनगर मार्केट यार्डवर लाल मिरची (सुकी) या शेतमालाची 13 जानेवारी रोजी जाहीर लिलावाद्वारे खरेदी सुरू होणार आहे. शेतकऱ्यांनी आपला शेतमाल बाजार समितीचे मुख्य मार्केट यार्ड येथे दुपारी 12 वाजेपर्यंत विक्रीस आणावा व या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन समितीचे सभापती गंगाधर वैद्य, सचिव संजय पावडे व संचालक मंडळाने केले आहे. लाल मिरची विक्रीस आणण्यापूर्वी शेतकऱ्यांनी वाळवून व बारदाण्यामध्ये आणावी. हा बाजार आठवड्यातील दर शनिवारी सुरू राहील.

CLICK TO SHARE