ढाबा चालकावर अज्ञात युवकांचा हल्ला

क्राइम

शहर प्रतिनिधी:नरेंद्र कांबळे बल्लारपूर

कळमना मार्गावरील यदुवंशी ढाबा चालकावर अज्ञात युवकांनी हल्ला करून तोडफोड केल्याची घटना दुपारी २ वाजता उघडकीस आली. तक्रारीवरून पोलिसांनी फरार आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यदुवंशी ढाब्याचे संचालक राममिलन यादव हे नेहमीप्रमाणे पत्नी व कामगारांसह दैनंदिन कामे करीत होते. दरम्यान, अज्ञात युवकांनी राममिलन यादव यांच्यावर हल्ला केला. यात एक महिला जखमी झाली. हल्ला करून हे युवक फरार झाले.

CLICK TO SHARE