अल्लीपुरातील शंकर पटात धावली सर्जा-राजाची जोडी,कृषी प्रदर्शनीत उसळली गर्दी

खेल

तालुका प्रतिनिधी:सुनिल हिंगे अल्लिपुर

येथील शंकरपटव्यवस्थापन कमिटीच्यावतीने शंकरपट, कृषी प्रदर्शनीचे आयोजन केले आहे. या शंकरपटाच्या दाणीवर सर्जा-राजा धुरळा उडवित आहेत. यामध्ये महिलाही बैलजोड्या हाकत असल्याने नागरिकांची मोठी गर्दी आहे.उद्घाटन देवळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मनोज वसू यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अॅड. सुधीरकोठारी उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून माजी खासदार सुरेश वाघमारे, शिवसेना जिल्हा समन्वयक रविकांत बालपांडे, जिल्हाप्रमुख श्रीकांत मिरापूरकर, सरपंच नितीन चंदनखेडे, माजी सरपंच प्रभाकर फटिंग, संजय गांधी निराधार योजनेचे माजी अध्यक्ष सुरेश सातोकर, माजी सरपंच माणिक कलोडे, शेतकरी कन्या नेहा ठोंबरे यांची उपस्थिती होती. यावेळी उत्कृष्ट शेतकरी बांधवांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक माजी ग्रामपंचायत सदस्य श्रीराम साखरकर यांनी केले.

CLICK TO SHARE