साहेब,मोकाट कुत्रे तोडताहेत लचके, नागरिकांनी ये-जा कशी करायची?

हेल्थ

शहरातील नागरिक त्रस्त:नगर पालिकेकडून उपाययोजना आवश्यक करावे

अजय दोनोडे तालुका प्रतिनिधी आमगांव आमगांव : शहरात गत काहीदिवसांपासून मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट झाला आहे. कुत्रे रस्त्यावर चालणाऱ्या व्यक्तींवर धावून जात चावाही घेत आहेत. आमगांव शहर आणि परिसरात हजार नागरिकांना श्वानदंश झाल्याची आकडेवारी समोर येत असून, अनेकांना सामान्य रुग्णालयात कुत्र्याने चावा घेतल्यानंतर अॅण्टिरेबिजची लसी टोचून घ्यावी लागत आहे. यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.मोकाट कुत्र्यांमुळे नागरिक आणि बालक कमालीचे त्रस्त झाले आहेत. रस्त्याने जाणाऱ्या लहान मुलांवर मोकाट कुत्र्यांनी हल्ला केल्याच्या अनेक घटना शहरात घडल्या असून, यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शाळकरी विद्यार्थ्यांचा हे भटके कुत्रे पाठलाग करतात. यामुळे भीतीने शाळेत जाण्यास मुले टाळाटाळ करत असल्याची पालकांची तक्रार आहे.व रात्री रस्त्याने ये-जा करणे नागरिकांना कठीण झाले आहे. दुचाकीवरून जाणाऱ्यांचाही हे कुत्रे पाठलाग करतात आबाल वृध्दांमध्ये भीतीचे वातावरण वृद्ध नागरिक तसेच लहान मुलांमध्ये मोकाट कुत्र्यांमुळे भीतीचे वातावरण पसरलेले आहे. आमगांव शहरातील तसेच किगडिपार रोड वर ती मोठ्याप्रमाणात मोकाट कुत्री आहेत, ही कुत्री वेळप्रसंगी दबाधरून बसतात. त्यानंतर रस्त्याने ये जा करणार्यावर गुपचूप हल्ला चढवितात. त्यामुळे नागरिक चांगलेच दहशतीत आहेत. *अपघाताचीही भीती* • रस्त्यावर ठिकठिकाणी मोकाट कुत्र्यांचा दिवसभर ठिय्या असतो.• हे कुत्रे रस्त्यावर सतत ईकडे, तिकडे धावत असतात.• मुख्य रस्त्यावर असलेल्या मोकाट कुत्र्यांच्या उच्छादामुळे अपघात घडण्याची शक्यताही नाकारता येत नाही. *चौक, मंदिर शाळा बाजार परिसरातही कळपाचा ठिय्या* शहरातील मुख्य रस्ते, बसस्थानकासह सर्वच मुख्य चौकांत कुत्र्यांचा कळप असतोच शिवाय शहरातील बाजार, मंदिर परिसर, शाळांची, मैदाने, नागरी वसाहतीसह सर्वच सार्वजनिक ठिकाणांचा ताबा मोकाट कुत्र्यांनी घेतल्याचे दिसून येते.

CLICK TO SHARE