जीवा-सिकंदरने मारली बाजी अल्लीपूर येथे शंकरपट व कृषी प्रदर्शन मेळावा

खेल

तालुका प्रतिनिधी सुनिल हिंगे अल्लिपुर

अल्लीपूर, ता. १५ : शेतकरी शंकर पट, कृषी प्रदर्शन व पशु प्रदर्शन, महिला मेळावा, रोगनिदान व उपचार शिबिर, इंजि. भाऊ थुटे यांचा सप्त खंजिरी प्रबोधन कार्यक्रम, नेहा ठोंबरे यांचा विनोदी कार्यक्रम आयोजित करण्यात आला. शंकरपटात बुलढाणा येथील जिवा-सिंकदरने बाजी मारली.शंकरपटात २५२ बैलजोडया सहभागी झाल्या होत्या. साधारण गट १ व २, जिल्हा गट, तालुका गट, अशा चार गटांत ही स्पर्धा झाली. एकमेव महिला पट हाकणारी धुरकरी सीमा पाटील, बुलढाणा ही महिला वयाच्या पंधराव्या वर्षापासून धुरकरी आहे. त्यांचा शाल श्रीफळ ट्रैफि मानचिन्ह प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला.अ गटांत प्रथम बुलढाणा येथील शिवानी राठोड यांनी बक्षिसासह चांदीची गदा मिळविली. चिंतामण शिरसा हिंगोली, किशोर कडू, आदित्य दमाने,किशोर कडू, नागपूर, विष्णू रोवणे लोणी गवळी, गौरीशंकर पाटील अकोला, चंडू डफडे पाटील, आशीष सायंकार, जीवन इंगळे, सेलू खानदेश, प्रकाश ठाकरे, ओम पाटील, सुनील वैद्य, सायखेडा, तर ब गटांत गजानन वाबळे वाशीम, जिगी ग्रुप अमरावती, सुमेरखा पठाण वाशीम, आशीष सायंकार, प्रवीण खाडे निंवाळा, विशाल बगवे अल्लीपुर, वंश नेहारे कळंब, मुकिंदा मालधुरे, गायकवाड, मुबारकपूर, सागरभारतगेडे जवळा, अभय जुनाके, राजेश काचळे, काचनगाव, विशाल उमक, विठ्ठल जाधव, चेतन साळवी यांनी पुरस्कार मिळविले,जिल्हा गटात प्रथम क्रमांक बंडू दबडे पाटील, डॉ.एस.के. आशिष सामोरे, विरूळ, विशाल उमक, नाचणगाव; सालंकर विरूळ, इरफान पठाण अधेगाव, लक्ष्मण सुपारे अल्लीपूर, दिनेश तिमांडे, तरोडा, गजानन वाभळे, सुमेरखा पठाण, डॉ. सालोंकर, विशालबगवे, वंश नेहारे, मुकिंदा मालधुरे, सागर गेंडे, अभय दुमोळे, राजेश काळे, खुशाल बकाने,तालुका गटात प्रथम बक्षीस रणजित ढगे अल्लीपुर, प्रदीप कोल्हे चानकी, रिझवान पठाण, अंकुश सुपारे अल्लीपूर, दादा पिसे अल्लीपुर, सचिन शिंगाडे सिरजगाव यांनी पुरस्कार मिळविले.माजी आमदार राजू तिमांडे, देवळी बाजार समितीचे सभापती मनोज वसू, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मनोज चांदूरकर, विकास साहू, हरीश बडतकर, माणिक कलोडे, प्रभाकर फटिंग, उमेश कापकर, लक्ष्मण भारस्कर, सचिन पारसडे, धनराज सुपारे यांच्या हस्ते विजेत्यांचा बक्षीस, मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. आयोजनाकरिता श्रीराम साखरकर, गोपाल मेघरे, गोपाल गिरडे, रणजित ढगे, गोपाल कामडी, सुधाकर ढोबळे, संदीप नरड, रामप्यारा कामडी, मुकिंदा गिरडे यांनी सहकार्य केले. प्रास्ताविक गोपाल मेघरे तर संचालन कैलास बाळबुधे यांनी केले.

CLICK TO SHARE