रेती चोरट्यांवर एलसीबीची कारवाई

क्राइम

शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर

गुप्त माहितीच्या आधारे नागभीड तालुक्यातील तळोधी पोलिस ठाण्याच्या हद्दीत एलसीबी पथकाने रेती तस्करीचे तीन ट्रॅक्टर जप्त करून लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईमुळे रेती चोरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सध्या जिल्ह्यात रेती चोरी मोठ्या प्रमाणात सुरू आहे. रेती तस्कर स्थानिक पोलिसांची नजर चुकवून मोठ्या प्रमाणात रेती चोरी करत आहेत. जिल्हा पोलिस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांच्या सूचनेवरून एलसीबीच्या पथकाने अशा रेती चोरांविरुद्ध मोहीम सुरू केली आहे.

CLICK TO SHARE