शहर प्रतिनिधी:नरेंद्र कांबळे बल्लारपूर
बल्लारपूर शुक्रवार दि- 26/01/2023- आम आदमी पार्टी तर्फे दरवर्षीप्रमाणेच यावर्षीही शहरातील बालाजी वार्ड येथील शांतीनगर परिसरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरूवात महापुरूषांच्या प्रतिमांना माल्यार्पण करून करण्यात आले. त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करून राष्ट्रगीत म्हणण्यात आले. त्यानंतर परिसरातील लहान मुलांनी आपले नृत्य कौशल्य दाखविले. बल्लारपुरचे शहराध्यक्ष रविभाऊ पुप्पलवार, चंद्रपुर जिल्हा उपाध्यक्ष प्रा. नागेश्वर गंडलेवार, महिला आघाडी जीलाध्यक्षा ज्योतिताई बाबारे यांच्यासह शहरातील संपूर्ण पदाधिकारी, कार्यकते व गणमान्य व्यक्तिची देखील कार्यक्रमास उपस्थिती होती, ज्यामध्ये जी.एन काॅलेज चे सेवानिवृत्त प्राचार्य डॉ. प्रकाश चौकसे, डॉ. वाड़ई, डॉ. श्रीनिवास तोटा, सेवानिवृत्त प्राचार्य श्री. नरेंद्र कौरासे, पत्रकार श्री. मनीष तावाड़े, श्री.पाशा शेख, श्री. उमर शेख, कु. शिवानिताई वनकर, एड. निर्मलाताई घायवन इत्यादी गणमान्य व्यक्ती प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन युथ सचिव शिरीन सिद्दीकी यांनी व आभार संघटन मंत्री रोहित जंगमवार यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीते करीता सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच परिसरातील नागरिकांकडून सहकार्य लाभले.