नरखेड तालुक्यात प्रजासत्ताक दिनानिमित्त उत्साही वातावरण शाळा,कॉलेज,ग्रामपंचायत दुमदुमल्या

देश

नरखेड तालुक्यात प्रजासत्ताक दिनानिमित्त उत्साही वातावरण शाळा,कॉलेज, ग्रामपंचायत दुमदुमल्या

प्रतिनिधी:रितेश कान्होलकर खरसोली

देशाने संविधानाचा स्वीकार करून लोकशाहीतील एका नव्या पर्वाची सुरुवात केली होती तो दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून संपूर्ण भारतात साजरा केला जातो त्यामुळे तालुक्यात आनंदाचे वातावरण पसरले होते तसेच ग्राम पंचायत सिंधी (उमरी) येथे ध्वजारोहण कऱण्यात आले आणि प्राथमिक शाळेतील चिमुकल्यांना घेऊन गावामध्ये प्रभातफेरी काढण्यात आली नंतर ग्रामपंचायत प्रांगणात येऊन प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले तसेच विद्यापीठात मिरिट आल्याबद्दल अक्षय शेषराव नेहारे आणि भाग्यश्री शेषराव नेहारे या गावातील दोन भावंडांचा ग्राम पंचायत कडून शाल-श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला त्यानंतर माध्यमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी देशभक्ती गीत व नृत्य सादर केले तसेच आरोग्य सेवकाकडून कृष्ठरोगाबद्दल तसेच विद्युत विभागाकडून रूफटॉप सोलर योजनेबद्दल व कृषीशेवका कडून शेती विषयक माहिती देण्यात आली नंतर लगेच ग्रामसभेला सुरुवात झाली त्यामधे लोकांनी आपल्या समस्या मांडल्या तेव्हा ग्रामपंचायतने ते पूर्ण करण्याची ग्वाही दिली त्यावेळी सरपंच , उपसरपंच,सदस्य, आरोग्यसेविका ,आशावर्कर, अंगणवाडी सेविका,तलाठी , व गांवकरी मोठ्याप्रमाणात उपस्थीत होते .

CLICK TO SHARE