बस चालकाच्या समयसूचकतेने २० प्रवासी बचावले

अन्य

शहर प्रतिनिधी:नरेंद्र कांबळे बल्लारपूर

बल्लारपूर येथून तोहगाव लाठीकडे जाण्यासाठी २० प्रवासी घेऊन निघालेल्या राजुरा आगाराच्या बसचा येथील महात्मागांधी संकुलजवळ अचानक ब्रेक फेल झाले. चालकानेसमयसूचकता दाखवत अ क्सिलरेटरने वेग कमी करीत वीज खांबाला धडक दिली. त्यामुळे बस थांबली. ही घटनाशुक्रवारी सायंकाळी ४: १५ वाजता घडली. यात जीवितहानीझाली नसली तरी बसचे नुकसान झाले. चंद्रपूर येथून येणारीपरिवहन महामंडळाची बस क्रमांक एम. एच. ४० एन ८९८६प्रवाशांना घेऊन तोहगाव, लाठी येथे जात असताना शुक्रवारीसायंकाळी महात्मा गांधी संकुलजवळ अचानक बसचे ब्रेकफेल झाले.

CLICK TO SHARE