धोटेंच्या हस्ते रस्ता बांधकामाचे भूमिपूजन

अन्य

शहर प्रतिनिधी:नरेंद्र कांबळे बल्लारपूर

कोरपना तालुक्यातील मौजा सोनुर्ली येथे सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक १ चंद्रपूर अंतर्गत सिमेंट काँक्रीट रस्ता बांधकाम करणे अंदाजे किंमत १५ लक्ष रुपये निधीच्या विकासकामाचे लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते भूमिपूजन पार पडले. या प्रसंगी कोरपना काँग्रेसचे तालुकाध्यक्ष उत्तमराव पेचे, सोनुर्ली चे माजी सरपंच सुधाकर चांदेकर, गणेश काकडे, माजी सरपंच मारुती भोंगळे, सामाजिक कार्यकर्ते संजय बोगेकर, बाळा पाटील पारखी, वाडगुरेजी यासह स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

CLICK TO SHARE