तालुका प्रतिनिधी सुनिल हिंगे अल्लिपुर
कामगारांना ऑनलाइन कार्य प्रणाली बंधनकारक केल्याने कामगारांना मानसिक तसेच आर्थिक त्रास होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे ई. एस. आय. सी. कार्यालयाचे अधिकाऱ्यानी आनलाईन क्लेम सबमिट करण्याचा निर्णय मागे घेऊन. पुर्वीप्रमाणे कामगारांचे आजाराचे किंवा कोणत्याही हितलाभाचे पगार ऑफलाईन प्रमाणे चालू ठेवावे. अशी मागणी वर्धा जिल्हा सुती मिल मजदुर संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. आ. कुणावार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक तसेच उपक्षेत्रीय कार्यालय, नागपूर येथे आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आलेला आहे. कमी दाखवा