नारायण सेवा मित्र परिवाराचे सेवाभावी कार्य,ब्लड कॅन्सरग्रस्त बालकास दिला मदतीचा हात

सोशल

ब्लड कॅन्सरग्रस्त बालकास दिला मदतीचा हात उपचाराकरिता दिला १.५० लाखाचा धनादेश नारायण सेवा मित्र परिवाराचे सेवाभावी कार्य.

तालुका प्रतिनिधी:सुनिल हिंगे अल्लिपुर

हिंगणघाट येथील नारायण सेवा मित्र परिवार या सामाजिक संस्थेने ब्लड कॅन्सर ग्रस्त १६ वर्षीय बालक आशीष बेलसरे याचे वैद्यकीय उपचाराकरिता १.५० लाखाचा धनादेश देऊन मदतीचा हात दिला. सदर बालक गत तीन वर्षापासून ब्लड कॅन्सर ने ग्रस्त असून उपचाराचा खर्च जवळपास २५ लाख आहे.कुटूबाची जेमतेम आर्थिक परिस्थिती असून खर्च आवाक्याबाहेर असल्याने पी. वी . टेक्सटाइल जाम ने १.५० लाखाचा धनादेश नारायण सेवा मित्र परिवाराचे सुपूर्द केला.सदर धनादेश प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून स्थानिक शिवाजी उद्यानात आयोजित कार्यक्रमात पीडित आशीष च्या वडिलांना प्रदान करन्यात आला. यावेळी आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार समीर कुणावार होते. तर प्रमुख अतिथी म्हणून पी. वी. टेक्सटाइल चे उपाध्यक्ष आशोक आकडे,पारस मुनोत,प्रेम बसंतानी, अशोक मिहानी , महेश दीक्षित, महेश अग्रवाल यांची उपस्थिती होती. यावेळी अध्यक्षीय भाषणातून मनोगत व्यक्त करताना आमदार कुणावार यांनी नारायण सेवा मित्र परिवाराचे कार्य समाजाकरीता प्रेरणादायी असल्याचे सांगितले. प्रास्तावीकासह संचालन सचिव पराग मुडे यांनी केले. उपस्थितांचे आभार गौतम कोठारी यांनी मानले.कार्यक्रमाला मित्र परिवाराचे पदाधिकारी, सदस्य व गणमान्य नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

CLICK TO SHARE