सर्वांगिण विकासातून मुल तालुका महाराष्ट्रात अव्वल करणार:मंत्री सुधीर मुनगंटीवार

सोशल

नगरपरिषद क्षेत्रातील विविध विकासकामांचे लोकार्पण

जिल्हा प्रतिनिधी:मोहम्मद नासीर चंद्रपूर

चंद्रपूर : मुल तालुक्यात विविधलोकोपयोगी विकासकामे हाती घेण्यात आली आहे. मुख्य रस्ता, पाणीपुरवठा योजना, स्टेडियम, डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालय, तसेच शंभर खाटांचे उपजिल्हा रुग्णालय, कृषी महाविद्यालय, महिलांच्या पंखांना बळ देणारे सर्वोत्कृष्ट शुरवी महाविद्यालय यासारखे मोठे प्रकल्प उभे राहत आहे. मुल तालुक्याचा चेहरा मोहरा बदलविण्यासाठी सर्वांच्या सहकार्याची आवश्यकता असून सर्वांगिण विकासातूनच हा तालुका महाराष्ट्रात अव्वल करण्याच्या दृष्टीने कार्य करण्यात येत असल्याचे राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले.मुल नगरपरिषद क्षेत्रातील विविध विकासकामांच्या लोकार्पण कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, माजी भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा संध्याताई गुरनुले, मूलचे उपविभागीय अधिकारी विशालकुमार मेश्राम, तहसीलदार रवींद्र होळी, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यशवंत पवार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता प्रशांत वसुले, प्रभाकर भोयर, रत्नमाला भोयर, चंदू मारगोनवार, नंदू रणदिवे आदी उपस्थित होते.देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी हजारो शहिदांनी प्राणाची आहुती दिली, असे सांगून ना. सुधीर मुनगंटीवार म्हणाले, देशाला संविधान अर्पण होऊन ७४ वर्षे पूर्ण झालीत. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दायित्व, कर्तव्य व जबाबदाऱ्या संविधानामध्ये लिखित स्वरूपात दिल्या. त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी सर्वांची आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे हे ३५० वे वर्ष असून मुलचा गौरव वाढवीत छत्रपती शिवाजी महाराज व्यापार संकुलाची निर्मिती करण्यात आली.सर्वप्रथम जेव्हा स्व. दिलीप पारधी यांच्यासमवेत मुल येथे आठवडी बाजार बघण्यासाठी आलो. तेव्हा चिखल, कच्चा रस्ता व घाणीचे साम्राज्य होते. आता या ठिकाणी सुसज्ज अशा आठवडी बाजाराची निर्मिती करण्यात आली. महात्मा ज्योतिबा फुले या नावाने हे आठवडी बाजार सेवेसाठी लोकार्पित करीत आहे. महात्मा फुलेंनी शेतकऱ्यांचा आसूड हे पुस्तक लिहून शेतकऱ्यांसाठी असलेला भाव व्यक्त केला. हा बाजार येथील शेतकरी बांधवासाठी निश्चितच सेवा देईल, असा विश्वास ना. मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.

CLICK TO SHARE