चंद्रपूरची जागा भाजपसाठी आता बनली प्रतिष्ठेची

अन्य

शहर प्रतिनिधी:नरेंद्र कांबळे बल्लारपूर

देशात लोकसभा निवडणुकीसाठी वातावरण निर्मिती होत आहे. मोदी सरकारला घेरण्यासाठी काँग्रेसने इंडिया आघाडी तयार केली आहे. अशात नितीश कुमार पुन्हा एकदा ‘एनडीए’ सोबत जाणार असल्याचे समोर आले आहे. आप’नेही यातून वेगळे होण्याचा नारा दिला आहे. अशा परिस्थितीत भाजपने ‘अबकी बार. चारसौ पार’चा नारा दिला आहे. देशातील प्रत्येक लोकसभेच्या जागेवर विजय मिळविण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. यात चंद्रपूरचाही समावेश आहे.

CLICK TO SHARE