दिंडोरा बरेज प्रकल्प चे नित्कृष्ट दर्जाचे बांधकाम,बांधकाम नंतर 6 महिन्यातच टी व्हाल आणि भिंतीला भेगा

अन्य

दिंडोरा बरेज प्रकल्प चे नित्कृष्ट दर्जाचे बांधकाम बांधकाम नंतर 6 महिन्यातच टी व्हाल आणि भिंतीला भेगा.प्रकल्प च्या कामाचे उच्चतरीय चौकशी करण्यात यावी,प्रकल्प ग्रस्त शेतकरी यांची मागणी.

प्रतिनिधी — पवन ढोके ( वरोरा )

चंद्रपूर, यवतमाळ, आणि वर्धा जिल्यातील अत्यंत असा महत्वाचा प्रकल्प असलेला दिंडोरा बरेज प्रकल्प कोणताही पाटबंधारे विभागाचा अधिकारी, कोणी इंजिनिअर नसताना रामभरोसे काम करण्यात सुरु येत असून सदर कामात मोठा भ्रष्टाचार झाला आहे. पावसाळ्यात वाहत्या पाण्यात प्रकल्पचे काम करण्यात आले, कोणत्याही अधिकारीने या तांत्रिक गोष्टी कळे लक्ष दिल नसल्याने अखेर करोडो रुपयाच्या बांधकामला भेगा पडल्याने बांधकाम नित्कृष्ट दर्जाचे असल्याचे उघड झाले आहे, तरी शासनाच्या शिष्टमंडळाने चौकशी करण्यात यावी अशी मागणी समस्त दिंडोरा प्रकल्प ग्रस्त व गावातील वरिष्ठ लोकांनी केली आहे. दिंडोरा बरेज मधील अत्यंत महत्वाचे अधिकारी डेप्युटी इंजिनिअर जामगाळे आणि सिंग हे उपस्थित नसताना येथील काम कामगारांच्या भरोस्यावर सुरु होते, त्यावेळी अनेक वृत्तपत्रात माहिती प्रसिद्धी झाली होती हे विशेष. त्यावेळी प्रकल्पग्रस्त शेतकरी लोकांनी कामगारला विचारपूस केली असता अधिकारी लोकांनी दिलेल्या टार्गेट वर आमाला काम पूर्ण करा लागते असे उत्तरे कामगारांनी दिले होते. दिंडोरा बरेज प्रकल्प हा शेतकरी लोकांना महत्वाचा असून अस्या दुर्लक्ष करणाऱ्या अधिकारी वर कार्यवाही होणे गरजेचे आहे, सदर बांधकामला इतक्या लवकर सहा महिन्यात भेगा पडल्याने त्या परिसरातील सुमारे सहा ते आठ गावाला मोठा धोका निर्माण झालेला आहे, म्हणून या बांधकामची त्वरित चौकशी करण्यात यावी अशी मागणी दिंडोरा गावातील नागरिक करत आहे, आणि प्रकल्पग्रस्त मध्ये येणाऱ्या अनेक गावाचे पुनर्वसन न झाल्याने गावातील नागरिक अस्वष्ट आहे. दिंडोरा प्रकल्पचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे सुरु असल्यामुळे दिंडोरा, बामर्दा, सोईत, अस्या अनेक गावातील लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे, असल्या निकृष्ट कामामुळे भविष्यात धरण फुटण्याच्या धोका उदभणाऱ्या प्रकल्पच्या कामाची चौकशी लवकर करावी अशी मागणी होत आहे.

CLICK TO SHARE