सचिन वाघे याने केली विकास उर्फ विक्की साहू विरोधात चौकशी ची मागणी

अन्य

प्रतीनिधी:सचिन वाघे हिंगणघाट

सचिन वाघेला विक्की कोटेवार याने राष्ट्रीय महामार्ग येथील अतिक्रमण बद्दल न्याय मिळवुन देण्याची मागणी केली होती या वरून विक्की कोटेवार, विकास उर्फ विक्की साहू यांचा सबंध आला. सचिन वाघे याने संत तुकडोजी वार्ड येथील अतिक्रमण बद्दल जिल्हाधिकारी कडे विक्की कोटेवारने केली चौकशीची मागणी .बातमी प्रसिद्ध केली. दि.12/04/2023 ला तेलंग पेट्रोल पंप समोरील प्लॉट वरून कोटेवार सोबत विकास साहु याचा वाद झाला. त्यामुळे विक्की कोटेवार याने विकास उर्फ विक्की साहु बद्दल पोलिस स्टेशन ला सकाळी 11.30 ते 12 च्या दरम्यान तक्रार केली त्यानंतर संध्याकाळी याच जागेवर परत वाद केला, विकास उर्फ विक्की साहु याने विक्की कोटेवार याला व्हिडीओ रेकॉर्डींग करायला सचिन वाघे यांनी सांगितले तसेच रू.50 हजारची मागणी केली इतकेच नाही तर पेपर / फेसबुक मधुन बदनामी करीन सचिन वाघे व विक्की कोटेवार विरोधात हिंगणघाट पोलीस स्टेशनला खोटी तक्रार केली. त्यावेळेस पोलिसांकडुन मला बोलाविण्यात आले नाही. दि. 25/01/2024 ला परत अश्याच प्रकारचे आरोप केले यावेळेस मला पोलिस स्टेशनला बयान नोंदविण्यासाठी बोलविले.दि.28/12/2023 ला सोनु आर्या चे अपहरण तिघांन विरोधात गुन्हे दाखल ही बातमी सर्वात अगोदर पोर्टल व पेपर मध्ये प्रसिद्ध केली नंतर पत्रकारचे अपहरण नसून षडयंत्र आहे. ही बातमी प्रसिद्ध केली. या बातमीची दखल घेत विदर्भ युवा पदमशाली समाज कडुन जिल्हा पोलीस अधीक्षक कडे निवेदनातून अपहरण प्रकरणात चौकशीची मागणी झाली तसेच पत्रकार परिषद घेतली. तपास हा डॉ. सागर कवडे उपअधीक्षक पोलीस अधिकारी व उपविभागीय पोलीस अधिकारी रोशन पंडित याच्याकडे दी.15 जानेवारी 2024 ला देण्यात आला. यामुळे शहरात चर्चा सुरु झाल्या अपहरण बनावट आहे त्यामुळे विकास उर्फ विक्की साहू याला विचारपूस करणे सुरु झाले यामुळे सचिन वाघे विरोधात षडयंत्र रचून दी.25 जानेवारी ला सचिन वाघे याने पेपरमध्ये फेसबुक मध्ये बदनामी केली.पैशाची मागणी सुद्धा केली.त्यामुळे आत्महत्या करण्याचा विचार होत आहे.अशी खोटी तक्रार केली. सचिन वाघेला बोलविण्यात आले.सचिन वाघे याने बयानात सांगितले मी बातमी लावली अपहरण बनावट आहे हे लक्षात आले त्यामुळे परत माझ्या विरोधात खोटे आरोप केले त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करून खोटी तक्रार केल्यामुळे विक्की साहु विरोधात गुन्हे दाखल करावे

CLICK TO SHARE