ईव्हीएम हटाव भारत देश बचाव”करिता भारतीय बौद्ध महासभा चे तहसीलदार राजुरा याना निवेदन

अन्य

शहर प्रतिनिधी:नरेंद्र कांबळे बल्लारपूर

राजुरा:- डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेली द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थातच भारतीय बौद्ध महासभा या संस्थेच्या वतीने संपूर्ण भारतभर बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसाराचे कार्य सुरू आहे. या संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ. भीमराव यशवंत आंबेडकर यांच्या आदेशान्वये महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यामध्ये, सर्व तालुका शाखा, शहर व ग्राम शाखाच्या वतीने दिनांक 29 जानेवारी 2024 ला “ईव्हीएम हटाव भारत देश बचाव” हा नारा घेऊन ईव्हीएम मशीन बंद करण्याबाबत भारताच्या राष्ट्रपतीला, पंतप्रधानाला तसेच निवडणूक आयोगाला एकाच दिवशी निवेदन दिले.तहसील कार्यालय राजुरा येथे आज दी 29 जानेवारी 2024 रोज सोमवारला भारतीय बौद्ध महासभा राजुरा शाखाच्या वतीने श्री. तेलंग नायब तहसीदार राजुरा यांचे कार्यालयात दुपारी 2.00 वाजता भारतीय बौद्ध महासभेच्या पदाधिकारी तसेच संस्थेच्या सदस्य असे एकूण 59 सह्याची निवेदन देण्यात आले. या करिता धरमुजी नगराळे अध्यक्ष, गौतम चौरे सरचिटणीस, गौतम देवगडे कोषाध्यक्ष, भिमराव खोब्रागडे उपाध्यक्ष, मेघाताई बोरकर अध्यक्षा, किरण खैरे कोषाध्यक्ष, वंदना देवगडे उपाध्यक्षा, रत्नमाला मावलीकर उपाध्यक्षा, शीतल ब्राम्हने ग्राम अध्यक्षा, प्रेमिला नळे, पौर्णिमा ब्राम्हणे, कमल टेकाडे उपाध्यक्षा, तुळसाबाई खडसे, सुमन कांबळे, कुसुम कातकर, नागोराव पडवेकर, उत्तम रामटेके, दिवाकर जनबंधू, सतीश ब्राम्हणे इत्यादी राजुरा शाखा व राजुरा शहर, ग्राम शाखा चे पदाधिकारी मोठ्या संखेने उपस्थित होते.

CLICK TO SHARE