मातोश्री रमाबाई आंबेडकर जयंती निमित्ताने बल्लारपूरात सांस्कृतिक महोत्सवाचा आयोजन

अन्य

शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर

बल्लारपूर: मातोश्री रमाबाई आंबेडकर जयंती निमित्त बल्लारपुरतील विविध सामाजिक संघटनांच्या माध्यमातून बल्लारपुरत ५ फरवरी ते ११ फरवरी २०२४ पर्यंत मातोश्री रमाबाई जयंती महोत्सव आयोजित करण्यात आला आहे या अंतर्गत मातोश्री रमाबाई जयंती विचार संवर्धन समिती बल्लारपूर च्या माध्यमातून अवितम बौद्ध मंडळ सावित्रीबाई फुले चौक वइघआनगर वार्ड बल्लारपूर द्रारे ५ फरवरी ते ७ फरवरी पर्यन्त तिन दिवसीय प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तर पालीबुद्ध विहार बल्लारपूरच्या वतीने ८ फरवरीला बेघर जनकल्याण सोसायटीच्या पटांगणात रमाबाई आंबेडकर जयंती निमित्ताने प्रबोधनात्मक कार्यक्रम आहे तसेच बल्लारपुरतील संपूर्ण युवक युवतींनी एकत्र येत मातोश्री रमाबाई आंबेडकर जयंतीचे भव्य आयोजन करण्यात आले आहे या अंतर्गत शगुन लाॅन समोरील पटांगणात करण्यात आले आहे.७ फेब्रुवारीला रॅली चे आयोजन व मानवंदना देण्यात येणार आहे तसेच १० फेब्रुवारी ला सकाळी ६ वाजता महिलांचे मॅरेथॉन स्पर्धा आणि महिलांचे भव्य कबड्डी व खो-खो चे सामने आयोजीत केलेले आहेत सायंकाळी ७ वा अभिनेत्री प्रियंका उबाळे परभणी यांचा रडणारी नाही तर लढणारी रमाबाई व्हा यांचा रमाई जीवनावर आधारित पहिल्यांदाच पडघावर चित्रपट दाखविण्यात येणार आहे. ११ फेब्रुवारी ला सायंकाळी ६ वाजता सांस्कृतिक कार्यक्रम आणि स्थानिक युवक युवती द्रारे प्रबोधनाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

CLICK TO SHARE