तब्बल ३३ वर्षांनी फुलला’मैत्री बंध’मळा यशवंत हायस्कूल अल्लीपूर येथे माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमिलन सोहळा

एज्युकेशन

तालुका प्रतिनिधी:सुनिल हिंगे अल्लिपुर

हिंगणघाट:वर्ष निघून जातात, जात नाही त्या आठवणी. ३३ वर्षापूर्वी जिथे अध्यापन कौशल्याचे धडे घेतले, त्या हिंगणघाट तालुक्यातील यशवंत हायस्कूल अल्लिपूर येथे १९८९-९० मध्ये दहाव्या वर्ग बॅचच्या विद्यार्थ्यांनी भाऊबंधाची जपणूक केली. माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येत स्नेह मिलन सोहळ्या निमित्त जुन्या आठवणींना उजाळा दिला. ३३ वर्षाचा मोठा कालखंड लोटल्यानंतर प्रत्येक जण आपापल्या नोकरी धंद्यात, गोतावळ्यात व्यस्त असल्याने सहजासहजी शक्य होत नाही. मात्र, ते अशक्यही नसते हे अलीपुर येथील हायस्कूल मधील १९९० साली दहावी उत्तीर्ण होऊन गेलेल्या विद्यार्थ्यांनी दाखवून दिले. गावातील संवगडी, शाळेचा वर्ग, लाकडी बाक यांची आठवण प्रत्येकाच्या मनात आयुष्यभर घर करुन असते, शाळा सोडल्यावर पुन्हा त्याच लाकडी बाकावर बसण्याची इच्छा अनेकांच्या मनात वांरवार येतेच. म्हणुनच माजी विद्यार्थी स्नेहमेळाव्याच्या निमित्याने ३३ वर्षांनी शाळेतील मस्ती, एकत्रीतपणे केलेला अभ्यास, शिक्षकांचा वचक, क्रीडा स्पर्धा, शिक्षकांनी दिलेली शिक्षा, स्नेहसंम्मेलने व सांस्कृतीक कार्यक्रमाची धुम इत्यादी विषयावर माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन जुन्या आठवणींना उजाळा देत ओघातच आपण इतके मोठे झालो याचे क्षणभर विस्मरण झाले. काळाच्या ओघात माजी विद्यार्थ्यांच्या भेटीगाठी प्रसंगी गप्पांचे फड रंगू लागले. त्यातुनच ४५ माजी विद्यार्थ्यांनी रियुनियन म्हणजेच आयोजित स्नेहमेळावा. पहीली ते दहावी पर्यंत सोबत शिक्षण घेतलेले सहमित्र विद्यार्थी आज राजकारण, उद्योग, शिक्षण, प्रशासन, सांस्कृतीक, सामाजिक व अनेक व्यवसाय क्षेत्रात काम करीत असुन त्यांनी आपल्या कामाचा उंच ठसा उमटवला आहे. सकाळी शाळेच्या वेळात व गणवेशात सर्व माजी विद्यार्थी शाळेत एकत्र आल्यावर राष्ट्रगीताने शाळा सुरू झाली. वर्ग खोलीत गुलाबाचे फुलाने स्वागत करीत विद्यार्थी त्याच बाकावर आपल्या हातात चक्क पुस्तके घेवुन व वर्गात बसुन पुन्हा वर्गाचा थ्रिल अनुभवला. प्रसंगी शिक्षकाच्या भुमिकेमध्ये असलेले माजी विद्यार्थी विजय लिचडे याने सर्व विद्यार्थ्यांची आपल्या खुमासदार शैलीत हजेरी घेत वर्ग घेतला. तसेच वर्ग-कॅप्टनच्या भूमिकेत असलेले विनोद मुडे याच्यासह अनेक विद्यार्थ्यांनी यावेळी कविता, चारोळ्या बालपणीच्या आठवणी आणि मनोगतातून त्यावेळेच्या गुरूंचे स्मरण करुन जुन्या स्मृती जागवल्या. सर्वाच्या चेहऱ्यावर ३३ वर्षापूर्वीच्या बालपणीच्या काळात शिरल्याचे भाव होता. यावेळी रघोळया, लंगडी, गोट्या, दोरीवरील उडया इत्यादी पांरपारीक जुने खेळ खेळले. माध्यमिक शिक्षण पूर्ण करुन जीवनाच्या वाटांनी यश मिळविण्यासाठी बाहेर गावी निघालेले मूल – मुली आपल्या प्रपंच्यात असतांना एकत्र आले. यात गृहीणीं, डॉक्टर, प्राध्यापक, शिक्षक, प्रशासकीय अधिकारी, वाहन व्यावसाईक, बांधकाम व्यावसायीक, फोटोग्राफर, फार्मासीस्ट, ट्रांसपोर्ट, ईलेक्ट्रीशियन, व्यापारी वर्ग, व्यावसायिक व सामाजिक क्षेत्रात काम करणारे तरुण नेतृत्व म्हणून कार्यरत आहेत. समाज, शाळा, विद्यार्थी व मित्रांच्या सुख दुःखात धावुन जाण्यासाठी सोशल मिडीयाचा माध्यमातून एकत्र येऊन गतकाळातील धमाल आठवर्णीना उजाळा दिला आणी भविष्यातील समाजाप्रती असलेली कर्तव्येही निश्चित केली. या वेळी विद्यार्थ्यांनी स्व:हस्त लिखित गीत, गजल, नृत्य सादर करुन आनंद व्यक्त केला. शेवटी सर्व विद्याथ्यांनी एकत्रितपणे “जाने कहाँ गये वो दिन……” हे गाणे गातांना वातावरण अत्यंत धिरगंभीर झाले होत असतांना सर्वाच्या डोळयाच्या कडा ओलावल्या. सर्वांनी शेवटी असेच यापुढे प्रसंगानुरूप भेटत राहण्याचा संकल्प करुन निरोप घेतला. *’नकळत मैत्रीचे घट्ट बंध झालेबंध अपुल्या मैत्रीचे.. तुला न कळले, मला न कळलेसोनियाचे ते दोन कधी ढळले..’* या स्नेह मिलन सोहळ्यात जुन्या आठवणींपुढे पदाचा अविर्भाव फिका पडताना दिसला. दिसून आला तो शाळेत हरवलेल्या क्षणांचा शोध, मित्रांशी घालवलेला सहवास. यात डॉ. विलास ढगे, प्रा. डॉ. विनोद मुडे, मोटर्स व्यावसायिक मिलिंद कोठेकर, प्रशासकीय अधिकारी प्रकाश महतकर सचिव कृ.उ.बा.समिति,उमरेड, अंगणवाडी सेविका दमयंती साखरकर, इरफाना पठाण, टयूशन क्लासेस भाग्यश्री पांडे, ग्रापिक डिझाईन प्रशांत वाघमारे, डॉ. वर्षा चितोडे, फार्मासीस्ट अर्चना डफ, गृहिणी शुभांगी रेवतकर, मुक्ता नरड, मंजुषा गोठे, सिंधू जयपुरकर, मंदा वांदिले, संगिता गोमासे, ज्योती बेले, इंजिनियर सतीश सोगे, शिक्षक विजय लिचडे, प्रमोद इंगुलवार, संजय पादाडे, सुजाता कांबळे, उपसरपंच विजय कवडे, व्यावसायिक उमेश ढगे, प्रदीप म्हसकर, राजू कोठारी, संजय बेंडे, भैय्या ढाले, माजी सैनिक विलास सुपारे, ट्रान्सपोर्ट ज्ञानेश्वर गोठे, ट्रान्सपोर्ट विलास गवळी, शेतकरी नामदेव कोडापे, मिलिंद कांबळे, व्ही डी -२ किशोर तपासे, प्रा. संजय झाडे, लिपिक अमर जयपूरकर, मेघश्याम धनजोडे, नारायण शिवणकर, लँड व प्लॉटस ब्रोकर विनोद इंगोले, विडियो शूटिंग ज्ञानेश्वर ढगे, ग्रामविकास अधिकारी प्रमोद बिडवाईक, कॉन्ट्रॅक्टर शंकर गवाऱ्ले, डेकोरेशन व्यावसायिक गणपत खटी इत्यादी माजी विद्यार्थी प्रामुख्याने यांचा सहभाग होता. आयोजित स्नेहमेळाव्यास सर्व माजी विद्यार्थी मित्रांचे तसेच यशवंत हायस्कूल अल्लीपुरच्या विद्यमान मुख्याध्यापिका सौ. स्मिता धोकणे व दिलीप लांभाडे यांचे विशेष सहकार्य लाभले.

CLICK TO SHARE