इस्लाम धर्माचे अभ्यासक मौलाना सलमान आजहरीची सुटका करासकल मुस्लिम समाजाची मा.राष्ट्रपती,मा.राज्यपाल,मा.मुख्यमंत्र्यांकडे मागणी

अन्य

प्रतिनिधी : अशोक इंगोले हिंगोली

वसमत :इस्लाम धर्माचे गाढे अभ्यासक मौलाना सलमान आजहरी यांना गुजरात ए.टी.एस ने केलेल्या अटकेची निंदा करत मौलाना आजहरीची सुटका करण्याची मागणी सकल मुस्लिम समाजाने मा.राष्ट्रपती,मा.राज्यपाल,मा.मुख्यमंत्र्यांकडे केली आहेबुधवारी दुपारी सकल मुस्लिम समाजाने काँग्रेस पार्टीचे वसमत शहराध्यक्ष शेख अलिमोद्दीन,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहराध्यक्ष (शरदपवार गट) शेख अय्युब पॉपुलर यांच्या नेतृत्वात शहरातून मुकमोर्चा काढून उपविभागीय अधिकारी वसमत मार्फत उपरोक्त मान्यवरांना दिलेल्या लेखी मागणी निवेदनात नमूद करण्यात आले की महाराष्ट्रात गेल्या दोन वर्षापासुन मुस्लीम समाजाविषयी गरळ ओकण्याचे काम काही राजकीय मंडळी करीत असुन त्यांच्यावर कित्येक वेळा १५३ चे गुन्हे दाखल असतांनाही त्यांना एकदाही अटक करण्यात आली नाही,मात्र मुस्लीम धर्मविद्वान मौलाना अजहरी यांना एका कार्यक्रमात भाषणात केलेल्या शायरीमुळे गुजरात ए.टी.एस कडून मुंबईच्या घाटकोपर येथुन अटक करण्यात आली आहे.या अटकेचा समाजाकडून जाहिर निषेध नोंदवत मौलाना अजहरी यांची तात्काळ सुटका करण्याकरीता ट्रान्सीट रिमांड रद्द करण्यासाठी मा.उच्च न्यायालयात अपील दाखल करुन मौलाना अजहरी यांची त्वरीत सुटका करावी तसेचमिरा रोडवर झालेल्या भ्याड हल्याचा,कोल्हापुर येथील मस्जिदवर महानगरपालकिची अनाधिकृत कार्यवाहीचा तसेच कल्याण येथील १०० वर्षापुर्वीची हाजी मलंग दर्गाहवर वादग्रस्त वाक्याचे निवेदनातुन जाहीर निषेध नोंदवण्यात आलाया वेळी जमियतु आईम्मा वसमतचे अध्यक्ष मौलाना अब्दुल बासीत कासमी,मौलाना इम्तियाज बरकाती,मुफ्ती महोमद अल्ताफ,मौलाना महेफुज रहेमान नदवी,न.प.माजी उपाध्यक्ष खैसर अहेमद,म.रियाजोद्दीन कुरेशी,माजी नगरसेवक मैनोद्दीन संदलजी, रविकिरण वाघमारे,शेख मोहसीन,नसिर कुरेशी,नदीम सौदागर,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजितपवार गट) वसमत शहराध्यक्ष मुजाहीद उर्फ मुजीब पठाण,अल्पसंख्याक शहर अध्यक्ष माजिद इनामदार,समाजवादी पार्टीचे शहराध्यक्ष शेख मजहर महेबुब आदीं सह असंख्य समाजबांधव मोठ्या संख्येत उपस्थित होता

CLICK TO SHARE