खडकी पंचशील बुद्ध विहार येथे रमाई जयंती साजरी करण्यात आली

धर्म

प्रतिनिधी:योगेश नारनवरे खडकी

नरखेड:रमाबाई भिमराव आंबेडकर यांचा जन्म 7 फेब्रुवारी 1898 रोजी वनंदगाव येथे एका दलित कुटुंबात झाला त्यांचे वडील भिकू धूत्रे ( वलंगकर) व आई रुक्मणी व तीन बहिणी व एक भाऊ ( शंकर) होता रमाई त्यांचे लग्न झाले तेव्हा त्यांचे वय 9 वर्ष होते त्यावेळी बालविवाची प्रथा समाजात रूढ होती रमाबाई यांचा विवाह भीमराव रामजी आंबेडकर यांच्याशी झाला तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे वय 14 होते रमाबाईने जीवनात खूप दुःख सहन केले त्यावेळी रमाईने आपल्या निष्ठेने त्यागाने आणि कष्टाने स्वतःच्या संसाराचा गडा हाकलून बाबासाहेबांना ध्येय गाठण्यात मदत केली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाच्या वाटेवर व देश हिताच्या कार्यात त्यांच्या आदनागिणी म्हणून मोलाचे सहकार्य केले , त्यात माता रमाईचा महत्त्वाचा त्याग आहे रमाबाई भीमराव आंबेडकर यांची 126 वी जयंती खडकी येथील पंचशील बुद्ध विहारात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली त्यानिमित्य भव्य मिरवणूक काढण्यात आली महिला मंडळ आणि पंचशील कमिटीतर्फे कार्यक्रमाचे आयोजन विहाराच्या प्रांरगणावरुन करण्यात आले सकाळी रांगोळी स्पर्धा व माता रमाई व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून सुरुवात करण्यात आली गावातील महिलांनी कार्यक्रमाची शोभा वाढवली कार्यक्रमाचे अध्यक्ष उमाकांत पाटील माता रमाई वर भाषण व मार्गदर्शन केले लहान मुलींनी रमाईची वेशभूषा करून नृत्य व नाटक भाग घेतले कार्यक्रमात पंचायत समिती सदस्य सुभाषजी पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते गट ग्रामपंचायत सदस्य योगेश नारनवरे, गितेश पाटील ,संदीप नारनवरे , गंगाधरजी नारनवरे , मनोहरजी नारनवरे , हरिदासजी मानेराव, प्रदीप नारनवरे ,विनायक बागडे ,अनिल गजभिये ,गजाननजी शेंडे, चंद्रशेखर नारनवरे ,अशोक राऊत विनायक चनकापुरे ,विनायक नारनवरे ,जगदीश नारनवरे ,अरुण नारनवरे ,अरविंद नागनवरे ,विजय शेंडे ,भीमराव शेंडे ,आशिष नारनवरे ,सुमित हनवते ,अतुल नारनवरे ,रवि नारनवरे ,योगेश धोंगडे ,राहुल नारनवरे ,कुणाल माणेराव,प्रमोद शेंडे,सिद्धार्थ नारनवरे,भूषण शेंडे,रितिक चनकापुरे ,व उपस्थित समप्त गावकरी मंडळी ,

CLICK TO SHARE