प्रा.डॉ.श्याम मानव यांचे बल्लारपूरात व्याख्यान

अन्य

प्रा.डॉ.श्याम मानव यांचे बल्लारपूरात व्याख्यान, पहिल्या राज्यस्तरीय पुरोगामी साहित्य संमेलन 24 फरवरी ला होणार कार्यक्रमाची जय्यत तयारी.

शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर

बल्लारपूर :- पहिले राज्य स्तरीय पुरोगामी साहित्य संमेलन. दिनांक-२४ फेब्रुवारी-२०२४ रोजी होऊ घातले आहे त्याची जय्यत तयारी सुरु आहे. कार्यक्रम परिसराला महाकवी वामनदादा कर्डक साहित्य नगरीं, असे नाव देण्यात आले असून, राजे बल्लाळशाह नाट्य गृह,बल्लारपूर जिल्हा चंद्रपूर येथे भरगच्च कार्यक्रम पार पडणार आहे. सकाळी ९:०० वाजता कार्यक्रमाचे उदघाट्न प्रख्यात विचारवंत प्रा.शाम मानव यांच्या हस्ते होईल.संमेलनाध्यक्ष म्हणून प्रसिद्ध साहित्यिक मा.शिवा इंगोले (मुंबई), हे या संमेलनाला लाभले आहेत.विशेष अतिथी- मा.निता चापले मॅडम(राष्ट्रीय माजी महिला क्रिकेटर,लेखिका,तथा समाजिक कार्यकर्ता)मुंबई.प्रमुख उपस्थिती-मा.विजय सूर्यवंशी रायगड. (संस्स्थापक अध्यक्ष,पुरोगामी पत्रकार संघ,भारत), मा.बाळासाहेब आटांगळे,मुंबई. (राष्ट्रीय कार्याध्यक्ष,पुरोगामी पत्रकार संघ) मा.संतोष जाधव, नाशिक(राज्य अध्यक्ष,पुरोगामी पत्रकार संघ,भारत) मा.निलेश ठाकरे(राज्य सचिव,(पुरोगामी पत्रकार संघ,भारत) तर स्वागताध्यक्ष म्हणून प्रसिद्ध साहित्यिक प्रब्रम्हानंद मडावी हे भूमिका बजावणार आहेत. स्वागत गीत – कु.स्नेहल शिरसाट, सूत्रसंचालन – मा.सिमा भसारकर, तर या साहित्य संमेलनाची प्रस्तावना एड. योगिता रायपूरे मांडणार आहेत.

CLICK TO SHARE