विदर्भ शाहीर कलाकार परिषद तालुका अध्यक्ष पदी सुधाकर खजुरिया यांची निवड

अन्य

प्रतिनिधी:विजय बागडे जामगाव

नरखेड तालुक्यातील जामगांव फाटा येथील ग्रापंचायत सदस्य श्री सुधाकर खजुरीया यांची दिनांक 06/02/2024 रोजी जामगांव फाटा येथे विदर्भ शाहीर कलाकार परिषद कन्हान या संस्थेची सभा झाली.या सभेत केंद्रीय कार्याध्यक्ष श्री.अलंकार जी टेंभुणै जिल्हा अध्यक्ष श्री. दयालजी कांबळे, व नागपूर सरचिटणीस श्री.अरुण जी वाहाने, ज्ञानेश्वर तायवाडे उपस्थित होते तसेच नरखेड तालुक्यातील कलावंत उपस्थित असून नरखेड तालुका अध्यक्ष म्हणून सुधाकर मारोतराव खजुरिया कार्याध्यक्ष श्री.विनायकराव पावडे,सचिव श्री.मारोती मा.कोल्हे, उपाध्यक्ष श्री.रामदास बडोदेकर,सहसचिव दादाराव चनकापुरे, कोषाध्यक्ष श्री प्रभाकर नागमोते,संघटक सुरेश वैष्णव,दत्तराज सोनुले,प्रचार प्रमुख रमेश रेवतकर, सदस्य म्हणून श्री सुनील खंडारे,सुखदेव तायवाडे,प्रकाश मदणकर,शंकर कामठी,विठ्ठल चौधरी,राहुल तागडे,धनराज खंडारे,अर्जुन शेंडे,मधुकर धानोरकर,वंदनाताई मसराम, रामप्यारी मोरोलिया,सविता तायवाडे यांची नियुक्ती करण्यात आली.सर्व उपस्थितांचे आभार सुधाकर खजुरीया यांनी मानले व बोलताना सांगितले,शेवटच्या कलावंत पर्यंत सर्व माहिती पोहचावी असा निर्धार करून संकल्प घेतला व गावकऱ्यांनी त्यांना शुभेच्या दिल्या.

CLICK TO SHARE