मुख्यमंत्री वायोश्रि योजना अंतर्गत ६५ वर्षांवरील जेष्ठ नागरिकांना मिळणार ३००० रुपये

अन्य

शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर

महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री वायोश्रि योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे ज्याचा लाभ १५ लाख जेष्ठ नागरिकांना मिळण्याची शक्यता आहे.ज्याना काही शारीरिक अपंगत्व किंवा मानसिक आजार आहे तसेच ज्याचे वय ६५ वर्षांपेक्षा जास्त असेल अशा नागरिकांची तपासणी केली जाईल आणि पात्र आढळलेल्या ३००० रुपये दिले जातील ही योजना सर्व जिल्ह्यांमध्ये ४८० कोटी रुपये खर्चून राबविण्यात येणार आहे सरकारी संस्थावरील विश्वास वाढवण्याचा उद्देशाने सरकारने सहाय्य योजना जाहीर केली आहे दिनांक ५ फेब्रुवारी २०२४ रोजी झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीमध्ये हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री वायोश्रि योजना महाराष्ट्रतील संपूर्ण जिल्ह्यांमध्ये राबविली जाणार आहे. आगोदर ठराविक जिल्ह्यामधे ही योजना सुरू होती.राज्य सरकारच्या निर्णयानुसार ग्रामीण आणि शहरी अशा दोन्ही भागांत हि वायोश्रि योजना राबविल्या जाणाऱ् आहे. ६५ वर्षांवरील नागरिकांचे वार्षिक उत्पन्न २ लाख रुपये अशा नागरिकांना वायोश्रि योजनेचा लाभ घेता येणार आहे.आवश्यक उपकरणे खरेदी करण्यासाठी निधी देण्यात येणार आहे.जेष्ठ नागरिकांचे मानसिक स्वास्थ संतुलित ठेवण्यासाठी जेष्ठ नागरिकांचे मानसिक स्वास्थ संतुलित ठेवण्यासाठी मनस्वास्थ्य केंद्रे व योगोपचार केद्वांद्वारे प्रबोधन व प्रशिक्षण सुद्धा योजनेतुन देण्यात येणार आहे.तुमच्या घरात कोणी जेष्ठ नागरिक असतिल तर तुम्ही त्यांना या योजनेबद्दल सांगु शकता. पात्र नागरिक या योजनेचा लाभ घेऊ शकता. योजने बदलची अधिक माहिती देण्यात आली आहे.

CLICK TO SHARE