चंद्रपूर कोळशाच्या खाणी बरोबरच चंद्रपूर बनतेय चित्रपट सृष्टीची खान

अन्य मनोरंजन

शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर

येणाऱ्या सर्व प्रोजेक्ट्स च्या माध्यमातून नवोदित कलाकारांना संधी देऊ निर्माते सागर सादमवार यांचे प्रतिपादन.दिनांक 11 फेब्रुवारी रविवार, नेस्ट एन्टरटेन्मेंट आणि जतन फिल्म प्रोडक्शन प्रस्तुत कस्तूरी या लघुचित्रपटा साठी गेल्या अनेक दिवसापासून चंद्रपूर जिल्ह्यातील विविध शाळांमध्ये कॉलेज मध्ये तसेच गावामध्ये ऑडिशन घेण्यात आले. या ऑडिशन च्या माध्यमातून अनेक नवोदित हौशी कलावंतांनी सहभाग घेतला व आपली कला चित्रपटाच्या माध्यमातून संधी मिळावी या हेतूने सर्वांनी प्रयत्न केले.. ज्याचें ज्याचें अभिनय प्रोडक्शन ला आवडले त्या सर्वांचे दिनांक 11/02/2024 रोजी रविवार ला नेस्ट एन्टरटेन्मेंट च्या ऑफिस मध्ये लूक टेस्ट घेण्यात आले व जवळ जवळ सर्वच कलाकारांची त्या मध्ये निवड कऱण्यात आली.या कार्यक्रमाला प्रामुख्याने चंद्रपूर जिल्ह्यातील लेखन व दिग्दर्शनामध्ये अग्रेसर असलेले एक मोठे नाव विजय भानसे उपस्थित होते. त्याचबरोबर नेस्ट एन्टरटेन्मेंट चे ओनर आणि कस्तूरी या लघु चित्रपटाचे निर्माते सागर सादमावर तसेच या चित्रपटाचे दुसरे निर्माते जितेश कुळमेथे तसेच व्यवस्थापक निर्माते विशाल सादमवार तसेच या चित्रपटाचे दिग्दर्शक जुगल गणवीर तसेच जतन फिल्म प्रोडक्शन चे कलावंत शितलकुमार रायपुरे तसेच दर्शना रायपूरे यांची देखील उपस्थिती होती…सागर सादमवार यांनी व्यक्तव केले की ही आमची सुरवात आहे या पुढें आम्ही अनेक चित्रपट तयार करनार आहोत आणि प्रामुख्याने जिल्ह्यातील कलावंताना घेऊनच आम्ही काम करू व आमच्या चित्रपटांच्या माध्यमातून त्यांची कला जगासमोर येवो एवढे बोलून त्यांनी उपस्थित कलावंताना शुभेच्छ दिल्या.

CLICK TO SHARE