हिंगणघाट विधानसभा क्षेत्रात अवकाळी पावसाने गारपिटीने शेतकऱ्यांचा शेतातील झालेल्या नुकसानाची हेक्टरी ५०००० /- रुपये आर्थिक मदत जाहीर करा

अन्य

प्रतिनिधी:करीम खान हिंगणघाट 9970336886

हिंगणघाट विधानसभा क्षेत्रात अवकाळी पावसाणे ,गारपिटीने शेतकऱ्यांचा शेतातील झालेल्या नुकसानाची हेक्टरी ५०००० /- रुपये आर्थिक मदत जाहीर करण्याकरिता प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या मार्गदर्शनात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देऊन मागणी केली आहे. हिंगणघाट विधानसभा क्षेत्रातील अनेक गावांमध्ये रविवारी सायंकाळच्या सुमारास झालेल्या वादळीवाऱ्यासह गारपिटीने रब्बी हंगामातील कापणीला आलेली गहू, चना, ज्वारी, तसेच शेवटच्या वेचणीला असलेल्या कापूस पिकाचे नुकसान मोठ्या प्रमाणात झालेले आहे.यासर्व पिकांचे सरसकट पंचनामे करून हेक्टरी ५००००/- रुपये तात्काळ शेतकऱ्याला आर्थिक मदत जाहीर करा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षा द्वारे निवेदन देऊन करण्यात आली आहे. यावेळी समुद्रपूर तालुका अध्यक्ष महेश झोटिंग पाटील, जिल्हा उपाध्यक्ष राजेश धोटे, ओबीसी जिल्हाध्यक्ष प्रशांत घवघवे, जिल्हा सरचिटणीस दशरथ ठाकरे, अपंग सेल जिल्हाध्यक्ष मारोती महाकाळकर, अल्पसंख्याक विधानसभा अध्यक्ष जावेद मिर्झा,अमोल बोरकर, सरपंच ईश्वर सुपारे, नितीन देशमुख, गणेश वैरागडे, सुनील भुते,जिल्हा सचिव सुचिता सातपूते,विधानसभा उपाध्यक्ष विद्या गिरी,शहर सचिव अर्चना नांदूरकर, युवती शहर अध्यक्ष माधवी देशमुख, गजानन महाकाळकर, नामदेव वैरागडे, हेमंत घोडे,किशोर चांभारे, परम बावणे, प्रवीण भुते, तुषार भोयर,नितीन भुते,उमेश नेवारे, सुशील घोडे, पंकज भट्ट, विनोद वैद्य,इरफान सैय्यद, दिनेश खेकडे, अन्सार भाई, राजू मुडे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते…

CLICK TO SHARE