कावराबांध येथील साप्ताहिक बाजार मंगळवार ऐवजी सोमवार ला,शिवाजी महाराज जयंती निमित्त केला बदल

अन्य

प्रतिनिधी / सालेकसा

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती सोहळा ग्राम कावराबांध येथे पहिल्यांदाच साजरी केली जाणार आहे. तालुक्यातील मोठी ग्राम पंचायत आणि बाजारपेठ म्हणून कावराबांधची ओळख आहे. यासाठी साप्ताहिक दर मंगळवार रोजी ग्राम पंचायत अंतर्गत गोवारीटोला येथे बाजार भरत असते. परंतु सामुदायिक जयंती उत्सव समिती सालेकसा आणि उडाण ग्रुप कावराबांध यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त कार्यक्रमाचे आयोजन केले गेले असल्याने २० फेब्रुवारी मंगळवार ऐवजी साप्ताहिक बाजार १९ फेब्रुवारी सोमवारी रोजी होणार आहे. ग्राम पंचायतीच्या वतीने सर्व शेतकऱ्यांना व भाजी विक्रेत्यांना मंगळवार ऐवजी सोमवार रोजी उपस्थित राहून आपले साहित्य विक्रीसाठी आणण्याचे आवाहन केले आहे. विशेष म्हणजे सालेकसा शहर येथे सोमवार रोजी बाजार भरत असते परंतु त्या ठिकाणी सोमवार रोजी भरणारा बाजार मंगळवार रोजी भरणार असल्याने व्यापाऱ्यांनी सोमवार रोजी कावराबांध येथे यावे असेही आवाहन सामुदायिक जयंती उत्सव समिती सालेकसा व उडान ग्रुप कावराबांध यांच्या वतीने करण्यात आले आहे.

CLICK TO SHARE