आम आदमी पक्षातर्फे शिवजयंती उत्साहात साजरी केली

अन्य

शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर

बल्लारपूर सोमवार दिनांक- 19 फरवरी 2024- शहरातील जुन्या नगरपरिषद चौक येथील स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमेजवळ आज शिवजयंती निमित्त सकाळपासूनच उत्साहाचे वातावरण होते. आम आदमी पक्षातर्फे बॅन्ड बाजांच्या गजरात, “जय भवानी, जय शिवाजी” च्या जयघोषात साजरा करण्यात आला. यानंतर नगरपरिषद चौकातील छ. शिवाजी महाराज व डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना माल्यार्पण करण्यात आले. यावेळेस शहराध्यक्ष रविकुमार पुप्पलवार व जिल्हा उपाध्यक्ष नागेश्वर गंडलेवार यांच्यासह शहरातील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

CLICK TO SHARE