छ.शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त भव्य कीर्तन आक्रोश जनशक्ती संघटना शाखा सावंगीचे आयोजन

अन्य

प्रतिनिधि:रवि वाहने शेंदुर्जनाघाट (अमरावती)

आक्रोश जनशक्ती संघटना सांवगी शाखा द्वारा आयोजित छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त समाज प्रबोधनकार सप्त खंजिरी वादक सत्यपाल महाराजांचे शिष्य इंजिनीयर पवन दवंडे (महाराज )यांचे आधुनिक कीर्तनाचा कार्यक्रम बुधवार दी. २१ फेब्रुवारीला सायं. ६ वा. आठवडी बाजार चौक सावंगी या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे या कार्यक्रमाचे उद्घाटक सुशीलभाऊ बेले (आक्रोश जनशक्ती संघटना संस्थापक अध्यक्ष )कार्यक्रमाचे अध्यक्ष रामदासजी मस्के सर (राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त ) मीनाताई राजेंद्र जिचकार (सरपंच ग्रामपंचायत सावंगी) देवेंद्र जिचकार (पोलीस पाटील सावंगी) अनिल भाऊ जिचकार (उपसरपंच ग्रा.पं. सावंगी) राम वैद्य (तंटामुक्ती समिती अध्यक्ष सावंगी) दिगांबर भाजीखाये (माजी शिक्षक) नितीनजी मनोहरे ( यशवंत माऊली फेम चित्रपट अभिनेता) मनीष पाबळे (सामाजिक कार्यकर्ता सावंगी) रजनीताई नितीन गुहे (सदस्य ग्रा.पं. सावंगी) संजय जिचकार (माजी सैनिक) राजेश वाहने (सामाजिक कार्यकर्ता) या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तरी सर्व शिवप्रेमी प्रबोधन प्रेमी यांनी हजारोच्या संख्येने उपस्थित राहून कीर्तनाचा लाभ घ्यावा असे आवाहन आक्रोश जनशक्ती संघटना संस्थापक अध्यक्ष सुशील भाऊ बेले तसेच सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी केले आहे.

CLICK TO SHARE