ग्राहक जनजागृती अभियान व ग्राहक पंचायत महाराष्ट्र ची तालुका कार्यकारीनी गठीत

अन्य

प्रतीनिधी:रितेश कान्होलकर नरखेड

नरखेड:ग्राहक पंचायत महाराष्ट्र ची नरखेड तालुका कार्यकारीनी गठीत करण्यात आली. संबंधीत कार्यक्रमात ग्राहक पंचायत महाराष्ट्र चे विदर्भ प्रांत अध्यक्ष तथा ज्येष्ठ पत्रकार शामकांतजी पात्रिकर सर, उपाध्यय मैडम ,कोषाध्यक्ष मुकेवार सर,नागपुर ग्रामीण अध्यक्ष कांचनमाला माकडे , नरखेड तालुका अध्यक्ष तथा सरपंच मोहदी दळवी राहुलजी दळवी , तालुका सचिव राहुलजी कान्होलकर गाव माझा न्यूज़ चे पत्रकार, मोहदी दळवी चे उपसरपंच संदीपजी नारनवरे व सर्व सदस्य सहकारी यांनी ग्रामस्थांना ग्राहक हक्क, समस्या, जागरुकता आदीवर चर्चा व मार्गदर्शन केले त्यावेळी समस्त गावकरी मंडळी उपस्थित होते.संबंधीत कार्यक्रमात महिला वर्ग व नागरिक यांची ग्राहक म्हणून होणारी खरेदीच्या वेळी फसवणूक कशी होते जसे पुरवठा विभाग , वजनमाप व जिथे जिथे ग्राहक म्हणून संबंध येतो आदीसंबंधी मार्गदर्शन व ग्राहक जागृकता करण्यात आली.

CLICK TO SHARE