छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने नगरपरिषद बल्लारशाह तर्फे शिवकालीन वेशभूषा स्पर्धा संपन्न

अन्य

शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने नगरपरिषद बल्लारशाह तर्फे शिवकालीन वेशभूषा स्पर्धा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने नगरपरिषद बल्लारशाह तर्फे दि.१९फेबुरवारी २०२४ रोजी बल्लारशाह मधील शाळेतील मुलांकरिता शिवकालीन वेशभूषा स्पर्धा जुना तालुका क्रीडा संकुल, बल्लारशाह येथे आयोजित करण्यात आलेली होती.सदर स्पर्धेची सुरुवात नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विशाल वाघ यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तींस पुष्पहार घालून केली. स्पर्धेस प्रचंड प्रतिसाद मिळालेला असुन जवळपास १५० विद्यार्थ्यांनी शिवकालीन वेशभूषा स्पर्धेत सहभाग नोंदविला होता.नगरपरीषद बल्लारशाहचे मुख्याधिकारी विशाल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे संपुर्ण नियोजन आणि अंमलबजावणी रीना बहोत,दिपक पंडित, प्रशांत गणवीर, श्रीनिवास रायला, मंगेश सोनटक्के,मनोज डोमळे, अर्जुन वैरागडे आणि अमोल रामटेके यांनी पार पाडले.सदर कार्यक्रमास इतर अधिकारी व कर्मचारी वर्ग यांनीही उपस्थित राहुन सहाय्य केले. स्पर्धेत वेशभूषा परीक्षक म्हणून रणरागिनी हिरकणी संस्था, बल्लारशाह मधुन संस्थेचे अध्यक्ष संजना राजेश मुलचंदाणी आणि संस्थेच्या सदस्या पुजल रोहरा पंजवाणी यांना आमंत्रित करण्यात आले आहे होते. स्पर्धेत निपक्ष पद्धतीने निर्णय व्हावा याकरिता सर्व स्पर्धकांना केवळ नंबर देण्यात आले होते तसेच परीक्षकांची नावेही निकाल जाहीर होईपर्यंत गोपनीय ठेवण्यात आली आहे होते.सदर स्पर्धेत गट-अ (१ ते ७ वी ) मध्ये प्रथम क्रमांक आराध्य सज्जनवार, द्वितीय क्रमांक ओमी येगीनवार व तूतीय क्रमांक रेहान सलीम अली यांनी पटकावला.गट,-ब (८ ते १२ वि ) मध्ये प्रथम क्रमांक नियती देवीदास बोरकर, द्वितीय क्रमांक साईना योगेश वडलकोंडावार व तूतीय क्रमांक शरवरी तेजपाल मानकर यांनी पटकाविला. स्पर्धेतील विजेत्यांना रोख पारितोषिक तसेच इतर सर्व स्पर्धकांना भेटवस्तू देण्यात आल्या. सर्व विजेत्यांना तसेच इतर स्पर्धकांना मा. मुख्याधिकारी विशाल वाघ यांच्यातर्फे शुभेच्छा देण्यात आल्या.

CLICK TO SHARE