छत्रपती शिवाजी महाराज जयंती सोहळा

अन्य

प्रतिनिधी:वसंत पाटील नरखेड

नरखेड:प्रबुद्ध समता समिती खैरगाव द्वारा आयोजित समाज भवन येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री . रविभाऊ चौधरी तर मुख्य अतिथी म्हणून श्री . सुधाकरजी काळे सर व श्री. प्रविणजी सावरकर होते. प्रमुख पाहुणे म्हणून श्री .राहुलभाऊ वानखेडे , श्री.रामचंद्रजी बहुरुपी, श्री.दामोदरजी गेडाम , सौ . चित्रलेखाताई गेडाम, सौ . मायाताई लोखंडे उपस्थित होते. यावेळी लहान चिमुकल्यांनी नृत्य सादर केले. विद्यार्थ्यांनी छान भाषने दिली. कार्यक्रमाचे संचालन सोनटक्के तर प्रास्ताविक संकेतजी वाळके यांनी केले. आभारप्रदर्शन श्री. जनार्दनजी गेडाम यांनी केले., कार्यक्रमाला प्रदिपजी लोखंडे, मनोज तायडे, बाबाराव गौरखेडे, सुरेशजी निकोसे, सुनिल गेडाम , रमेश निकोसे, पंकज लोखंडे, प्रफुल गेडाम, मुरलीधर वाकडे , गौतम लोखंडे, सुधीर रामटेके , जितेंद्र हुमने, लक्ष्मणजी रामटेके, सागर वानखेडे, गोकुल तायडे , सुरेन्द्र रामटेके, युवराजजी गेडाम तसेच सुनंदाताई रामटेके, रेखा सोनटक्के, रमाबाई गेडाम, दर्शना गेडाम , मोनालिसा ठोंबरे आदी उपस्थित होते. कमिटीच्या सर्व पदाधिकारी व सदस्य यांच्या सहकार्याने कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला. राष्ट्रगिताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली होती. प्रज्वल डेकोरेशन यांची सुध्दा मदत मिळाली.

CLICK TO SHARE