रोड अपघातात पोलिस एक कर्मचाऱ्याचा मृत्यू , एक गंभीर जखमी

अन्य

तालुका प्रतिनिधी:अजय दोनोडे आमगांव

आमगांव , ता.२५- देवरी पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या मुरदोली जवळ काल शनिवारी (ता.२४ फेब्रुवारी) रोजी झालेल्या रोड अपघातात एका पोलिस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना रात्री साडे दहाच्या सुमारास घडली. मृतकाचे नाव भूपेश कृष्णाजी औरासे (वय-२८) राहणार शिक्षक कॉलोनी देवरी असे आहे. तर जखमीचे नाव शैलेश भोई असे आहे.सविस्तर असे की, आमगाव पोलिस स्टेशन मध्ये कार्यरत कर्मचारी भूपेश हे आपले काम आटोपून देवरीच्या दिशेने शेंडा मार्गे आपल्या दुचाकी वाहनाने शैलेश सोवत यायला निघाले होते. मुरदोली गावाजवळ रस्त्याचे काम सुरू असल्याने रस्त्यामध्ये मिक्सर मशिन ठेवली होती. या मिक्सर मशिनला भूपेशची दुचाकी आदळल्याने भूपेश आणि शैलेष दोघेही गंभीर जखमी झाले. यात भूपेशचा जागीच मृत्यू झाला तर शैलेषवर देवरीच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

CLICK TO SHARE