महाशिवरात्रीच्या पावनपर्वावर हिंगणघाट बाजार समितीचे वतीने हजारो भक्तांना फराळ वाटप-सुधिरबाबू कोठारी यांचा पुढाकार

अन्य

तालुका प्रतिनिधी सुनिल हिंगे अल्लिपुर

हिंगणघाट तालुक्यातील संपूर्ण पंचक्रोशीत प्रसिद्ध असलेले पोहणा येथील रुद्रेश्वर देवस्थान येथे महाशिवरात्रीच्या पावनपर्वावर शेकडो वर्षांपासून यात्रा भरत असते. संपूर्ण विदर्भातून येथे मोठ्या प्रमाणात भाविक भक्त येत असतात. या भाविक भक्तांमध्ये खेडेभागातील महिला व लहान मुलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग असतो. या भाविक भक्तांना कृषी उत्पन्न बाजार समिती हिंगणघाट चे वतीने दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा फराळाचे वाटप करण्यात आले. साबुदाणा उसळ व फराळी चिवडा व थंड पाण्याची व्यवस्था करण्यात आली. हिंगणघाट बाजार समितीचे सभापती अँड सुधिरबाबु कोठारी यांचे हस्ते फराळ वाटपाचा शुभारंभ करण्यात आला.यावर्षी जवळपास ५०,०००(पन्नास हजार) भाविक भक्तांनी फराळाचा आस्वाद घेतला. या प्रसंगी हिंगणघाट विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार राजुभाऊ तिमांडे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार गटाचे) नेते श्री समिरभाऊ देशमुख,हिंगणघाट बाजार समितीचे उपसभापती हरीशभाऊ वडतकर, जेष्ठ संचालक मधुकरराव डंभारे, उत्तमराव भोयर, प्रफुलभाऊ बाडे,अशोकराव उपासे, राजुभाऊ मंगेकर, डॉ .निर्मेशजी कोठारी,घनश्यामजी येरलेकर,सौ. माधुरीताई चंदनखेडे, माजी संचालक,राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार गटाचे) तालुकाध्यक्ष विनोदभाऊ वानखेडे, शेषकुमारजी येरलेकर,तसेच हिंगणघाट खरेदी विक्री संघाचे उपाध्यक्ष राजुभाऊ भोरे, संचालक अनिलभाऊ दौलतकर, वडनेर ग्रामपंचायत सरपंचा सौ.कविताताई वानखेडे, पांडुरंगजी निंबाळकर, डॉ .अतुलभाऊ घोरपडे,पोहणा ग्रामपंचायत सरपंच नामदेवराव राऊत, रुद्रेश्वर देवस्थान पोहणा कमेटीचे गंगाधरराव कोल्हे,रामचंद्रराव पवार व इतर सदस्य व मोठ्या प्रमाणात भाविक भक्त उपस्थित होते.या प्रसंगी रुद्रेश्वर देवस्थान पोहणा कमेटीचे वतीने अँड सुधिरबाबु कोठारी व इतर संचालक मंडळींचा सत्कार करण्यात आला.व हिंगणघाट बाजार समितीचे वतीने करण्यात देण्यात आलेल्या सुविधांबद्दल खूप खूप आभार मानण्यात आले.

CLICK TO SHARE