पाणी बिलाच्या”प्रश्नांबाबत आम आदमीपक्षाचे कार्यकारीअभियंता यांच्यामार्फत पाणीपुरवठा.मंत्र्यांना निवेदन

अन्य

शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर

बल्लारपूर मंगळवार दिनांक:- 12 मार्च 2024 बल्लारपूर शहरातील पाण्याच्या अवाढव्य बिलांच्या संदर्भात आम आदमी पक्ष आक्रमक भुमिकेत दिसत आहे. 4 मार्च रोजी पक्षातर्फे एकदिवसीय बील दहन धरना आंदोलन देखील करण्यात आले. परंतु म.जी.प्रा बल्लारपूर ने सरासरी मासिक बिल देने व पुर्वजांची जुने प्रलंबित पाणी बिले माफ करने यासारख्या प्रश्नांबाबत बाबत ठोस अशी उत्तर दिले नाही. यावर मार्ग निघावा म्हणून शहराध्यक्ष रविकुमार पुप्पलवार यांच्या नेतृत्वात आप शिष्टमंडळाने कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण चंद्रपुर यांच्यामार्फत राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटिल यांना निवेदन पाठविले. या निवेदनात राजुरा व चंद्रपुर प्रमाणेच बल्लारपूर शहरात देखील वार्षिक सरासरी बिल लागू करण्याची शिफारस करण्यात आली. तसेच हे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधीन राहून शक्य नसेल तर पाणीपुरवठा करण्याचा अधिकार म.जी.प्रा कडून काढून नगरपरिषदे कडे सोपवावे अशी देखील मागणी करण्यात आली. ज्यांच्या पुर्वजांचे बिल थकित आहे त्यांना पिण्याच्या पाण्यापासून वंचित ठेवू नये त्यांची थकित बिले माफ करून त्यांना नवीन कनेक्शन देण्याची सुध्दा मागणी करण्यात आली. तसेच म.जी.प्रा कर्मचाऱ्यांचा उध्दटपणा, म.जी.प्रा कडून नळ सोडण्याचा वेळेचे नियोजन, पाईपलाईनच्या समस्या , मेन्टेनन्स च्या काळातील पर्यायी व्यवस्थेचे गैरनियोजन याबाबत देखील तक्रार करण्यात आली. यावेळेस माजी जिल्हाध्यक्ष सुनिल मुसळे, जिल्हाध्यक्ष मयुर राईकवार, जीलासाचिव राज नगराळे, संघठन मंत्री योगेश मुरेकर, शरहराध्यक्ष रविभाऊ पुप्पलवर, शहर उपाध्यक्ष अफजल अली, महिला अध्यक्षा किरण खन्ना, उपाध्यक्षा सलमा सिद्दिकी, मनीषा अकोले, रेखा भोगे, गणेश अकोले तसेच इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

CLICK TO SHARE