प्रतिनिधी:साजिद पठाण नागपुर
जलालखेडा (त.12) सट्टा पट्टी लिहिणाऱ्या एकाला जलालखेडा येथे पोलिसांनी अटक केली आहे.राजेंद्र लक्ष्मण विंचुरकर वय वर्ष 38 वर्ष रा.मदना असे आरोपीचे नाव आहे.जलालखेडा येथील बस स्थानक परिसरात सट्टा पट्टी लिहिताना अटक केली असून त्याच्याकडून 230 रुपये नगदी व साहीत्य पोलीसांनी जप्त केले असून आरोपी विरुद्ध जुगार कायद्यांतर्गत गुन्हे नोंद करून पुढील तपास ठाणेदार चेतनसिंग चौहान यांचे मार्गदशर्नाखाली फिरोज शेख, दिनेश जोगेकर, किशोर कांडेलकर करित आहे.सट्टा पट्टी लिहिणाऱ्या मागील मुख्य सूत्र धारान विरुद्ध कधी होणार कार्यवाही.पोलिसांनी ज्या व्यक्तीला अटक केली तो रोजनदारीने सट्टा पट्टी लिहिणारा असून सट्टा पट्टी खाणारे काही वेगळी मंडळी असून त्यांच्या विरुद्ध कधी कार्यवाही होणार असा प्रश्न गावकऱ्यांना पडला आहे.गावातून सट्टा पट्टी पूर्णपणे बंद करण्याची गरज.नरखेड तालुक्यात मोठ्या प्रमाणात सट्टा पट्टीचे जाळे पसरले आहे. यात मोठ्या प्रमाणात युवक वर्ग अडकले असून यामुळे कित्येकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहे. त्यामुळे सट्टा पट्टीचे अवैध धंदे करणाऱ्या विरुद्ध तात्पुरती कार्यवाही न करता कायमची बंद करण्याची गरज असून याबाबतचे लेखी निवेदन लवकर पोलिस अधीक्षक नागपूर याना देण्यात येणार आहे.