सामाजिक कार्यकर्ते सचिन भोयर सहकाऱ्यांसह भाजपात ना.सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत राजुऱ्यात पक्ष प्रवेश

अन्य

सामाजिक कार्यकर्तसचिन भोयर सहकाऱ्यांसह भाजपात ना.सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत राजुऱ्यात पक्षप्रवेश

शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर

राजुरा, दि. १४ मार्च राजुरा शहरातील युवकांवर चांगली पकड असणारे क्रिडा व सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणारे सचिन भोयर यांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत मंगळवारी (दि. १२) विधानसभा निवडणुक प्रमुख देवराव भोंगळे यांच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षात अधिकृतपणे जाहीर पक्षप्रवेश केला. राजुरा येथील जुना बसस्टँड चौकात आयोजित भव्य क्रिडा व सांस्कृतिक महिला महोत्सवात आलेल्या राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या शुभहस्ते गळ्यात भाजपचे दुपट्टे टाकून त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. या पक्षप्रवेशात सचिन भोयर यांचेसह प्रणय विरमलवार, राजु निमकर, मिथुन थिपे, महेश झाडे, अंकुश कायरकर, मयुर झाडे, प्रणव मसादे यांचा समावेश आहे.राजुरा शहरात मागील अनेक वर्षांपासून होत असलेल्या लोकप्रिय धनोजे कुणबी प्रिमीअर लीग (DKPL) या भव्य क्रिकेट सामन्यांचे आयोजन, देवरावमामा भोंगळे मित्रपरिवाराच्या वतीने घेण्यात येणारे महारक्तदान शिबीर अशा अनेक सामाजिक व लोकोपयोगी उपक्रमांतून सचिन भोयर यांनी तरूणांमध्ये चांगली पकड निर्माण केली आहे. त्यांच्या भाजप प्रवेशाने राजुरा शहरातील युवकांना भाजपकडे आकर्षिण्यासाठी चांगली मदत होईल, असे बोलल्या जात आहे.

CLICK TO SHARE