बेशिस्त वाहनचालकांना दणका! आमगांव पोलिसांनी हजारो रुपये चा दंड वसूल केला

अन्य क्राइम

तालुका प्रतिनिधी अजय दोनोडे आमगांव

आमगांव तालुक्यात पुलिस विभाग गाने वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा धडाका लावला आहे. तीन दिवसांत पोलिस विभागाने बेशिस्त वाहनचालकांवर करवाई करून कारवाई करण्यात आली आहे. व हजारो रुपये दंड वसूल केला. यामध्ये सर्वाधिक दंड राँग साइडने वाहन चालविणाऱ्या वाहनचालकांवर तसेच ‘नो पार्किंग’मध्ये उभ्या केलेल्या वाहनांवर करण्यात आला असून, त्यांच्याकडून दंड वसूल करण्यात आला आहे.गेल्या काही महिन्यांत आमगांव शहरातील वाहतुकीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अवैध प्रवासी वाहतूक, रस्त्यांवर झालेली अतिक्रमणे यांमुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी असल्याचे निदर्शनास आले आहे. त्याचप्रमाणे दुचाकी व चारचाकी वाहनांचे चालक अनेकदा सिग्नल तोडणे, झेब्रा क्रॉसिंगवर वाहने उभी करणे, ‘नो पार्किंग’मध्ये वाहने उभी करणे, रस्त्याच्या उलट्या बाजूने वाहने चालविणे तसेच वाहन चालविताना मोबाइलवर बोलणे अशाप्रकारे वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करतात. त्यामुळे वाहतुकीला अडथळा होत असून, अपघातालाही निमंत्रण मिळते. या पार्श्वभूमीवर वाहतूक पोलिसांनी बेशिस्त वाहनचालकांवर करवाई बडगा उभारला आहे.वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या प्रत्येकावर कारवाई केली जाणार आहे. कारवाई होऊ नये म्हणून वाहतुकीचे नियमांचे पालन करू नका, तर आपल्या आणि समोरच्या व्यक्तीच्या सुरक्षिततेसाठी आणि सुरक्षित प्रवासासाठी वाहतुकीचे नियम पाळणे गरजेचे आहे. यापुढेही कारवाई सुरूच राहणार आहे. त्याचप्रमाणे प्रवासी वाहतुकीवर लवकरच विशेष मोहीम राबवून कारवाई करण्यात येणार आहे.पोलिस निरीक्षक युवराज हाडे आमगांव

CLICK TO SHARE