मनोरुग्ण व्यक्तीने जळती अगरबत्ती दानपेटीत टाकल्याने मोठी रक्कम जळून खाक

अन्य

आजनसरा येथील संत भोजाजी महाराज देवस्थानातील घटना

तालुका प्रतिनिधी सुनिल हिंगे अल्लिपुर

विदर्भात प्रसिद्ध असलेल्या नजीकच्या आजनसरा येथील संत भोजाजी महाराजांच्या मंदिरात ठेवण्यात आलेल्या दानपेटीत गावातीलच मनोरुग्ण व्यक्तीने जळती अगरबत्ती टाकल्याने मोठी रक्कम जळून राख झाली. हि घटना 15 मार्च ला सकाळी 6 वाजताचे दरम्यान घडली असून सर्वत्र खळबळ निर्माण झाली आहे. श्री संत भोजाजी महाराजांच्या समाधी मंदिरात आठ दानपेट्या असूनधर्मदाय आयुक्त कार्यालयाचे सील लावून ठेवण्यात आलेल्या आहेत.दरमहिन्याला आयुक्त कार्यालयातील अधिकाऱ्याच्या व विश्वस्त मंडळाच्या देखरेखित ऑन कॅमेरा रक्कम मोजून राष्ट्रीयकृत बँकेत भरल्या जाते, आजनसरा हे तीर्थक्षेत्र संत भोजाजी महाराजांना अर्पण करण्यात येणाऱ्या पुरण पोळीच्या प्रसादासाठी विदर्भात सर्वत्र प्रसिद्ध असून सध्या या स्थळी येणाऱ्या पर्यटकांची आणि भाविक भक्तांची प्रचंड गर्दी वाढली आहे.अशातच गर्दीचा फायदा घेऊन आजनसरा येथील रहिवाशी असलेला मनोरुग्ण सुरेश काचोळे याने जळती अगरबत्ती दानपेटीत टाकल्याने मोठी रक्कम जळाल्याचे बोलल्या जात आहे. ही बाब सुरक्षा रक्षकांना दिसताच आग विझवण्यात आली.मात्र, दानपेटीला धर्मदाय आयुक्त कार्यालय वर्धा यांचे सील लावलेले असल्याने नक्की किती रक्कम जळाली हे कळू शकलेले नाही. सदर घटनेची माहिती विश्वस्त मंडळाकडून आयुक्त कार्यालय आणि वडनेर पोलिसांना देण्यात आली असून पुढील तपास सुरु आहे.

CLICK TO SHARE