युवकाची राजुरा मार्गावर वर्धा नदीत उडी घेऊनआत्महत्या

क्राइम

शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर

बल्लारपूर : मागील दोन दिवसांपासून बेपत्ता असणाऱ्या युवकांनी वर्धा नदीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना धुळीवंदनाच्या दिवशी उघडकीस आली. सदर युवक मोहम्मद नदीम मोहम्मद नईम असरफी (१९) असून जुनी टीचर कॉलनी बालाजी वार्ड, बल्लारपूर येथील रहिवासी आहे. मिळालेल्या माहितीनुसार धुळीवंदनच्या दिवशी बल्लारपूर राजुरा मार्गावरील वर्धा नदीत एका युवकाचे शव तरंगताना दिसल्याने वर्धा नदीच्या पुलाजवळील फळ विक्रेते यांनी बल्लारपूर पोलीस स्टेशन येथे माहिती दिली. बल्लारपूर पोलीस स्टेशन चे पोलीस उपनिरीक्षक गोविंद चाटे यांनी तत्काळ आपल्या पथकासह घटनास्थळी गाठत मृतदेह नदीतून बाहेर काढण्यात आले व कुटुंबीयांना बोलावून मृतदेहाची ओळख पटविण्यात आली.

CLICK TO SHARE