फाल्गुन पौर्णिमा निमित्त सामुहिक वंदना व सुत्तपठन कार्यक्रम

अन्य

शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर

बल्लारपूर: भारतीय बौद्ध महासभा वतीने चलो बुध्द की ओर या अभियानांतर्गत बौद्धकालीन संस्कृतीत जतन करणे, बौद्धांच्या लेण्या, बौद्ध शिलालेख तसेच पोरणिक बुद्ध विहाराचे जतन करणे त्यांना पुनर्जीवित करणे आणि हि बौद्ध कालीन संस्कुती समाजापर्यंत पोहोचवणे हे महत्वपूर्ण कार्य भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ भीमराव यशवंत आंबेडकर यांनी हातात घेतलेले आहे.त्याच्या आदेशान्वये चंद्रपूर जिल्हा मध्ये भारतीय बौद्ध महासभा जिल्हा चंद्रपूर पश्चिम विभाग तसेच बल्लारपूर शहर व तालुका शाखा तसेच विसापूर ग्राम शाखा च्या वतिनेू दिनांक २४ मार्च २९२४रविवार ला फाल्गुन पौर्णिमा च्या निमित्ताने चंद्रपूर बल्लारपूर हायवे रोडवरील पावर हाऊस विसापूर येथे असलेल्या पोरणिक बुद्ध विहार या ठिकाणी सामुहिक बुद्ध वंदना व सुत्तपठन चा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.बोधि सत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर व तथागत भ गौतमबुद्ध यांच्या प्रतिमाना पुष्पहार अर्पण करण्यात आले. र्कृष्णाक पेरकावर बौद्धाचार्य तथा केंद्रीय शिक्षक यांनी सर्व उपस्थित बांधवांना त्रिशरण पंचशील दिले. तसेच सामूहिक सुत्तपठन घेण्यात आले यावेळेस परिसरातील सर्व वातावरण धम्ममय झाले होते. यानंतर शेषराव सहारे केंद्रीय शिक्षक यांनी “फाल्गुन पौर्णिमा आणि बौद्ध धम्म” या विषया वर सविस्तर मार्गदर्शन केले.अशोक घोटेकर विदर्भ प्रदेश अध्यक्ष आणि जिल्हाध्यक्ष इंजी.नेताजी भरणे यांनी उपस्थित बांधवांना मार्गदर्शन केले व पौर्णिमेच्या शुभेच्या दिल्यात. सौ गायत्री ताई रामटेके अध्यक्ष बल्लारपूर शहर शाखा यांनी आभार प्रदर्शन केले. या कार्यक्रमात ऍड. जगदीप खोबरागडे जिल्हा सरचिटणीस, संदीप सोनोणे जिल्हा उपाध्यक्ष, प्रफुल भगत मेजर तथा जिल्हा उपाध्यक्ष, सुजाता लाटकर जिल्हा उपाध्यक्ष, ऋषि नगराळे सीनियर डिवीजन ऑफिसर, किशोर तेलतूबड़े चंद्रपूर शहर सचिटणीस, संकेत जयकर उपाध्यक्ष चंद्रपूर शहर, पंचशीला वेल्हे केंद्रीय शिक्षिका, संगीता शेंडे  केंद्रीय शिक्षिका तसेच विसापूर शाखेचे अध्यक्ष संजय वानखेडे, पाझारे, सचिन पुणेकर, बादल देशभ्रतार, दूरेश तेलंग, धर्मुजी नगराळे तसेच बल्लारपूर, विसापूर आणि चंद्रपूर शहरातील बौद्ध बांधवांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. शेवटी सरणत्य घेऊन हा कार्यक्रम संपला

CLICK TO SHARE