गुरुदेव सेवा मंडळाच्या वतीने गावातून काढली मिरवणूक

धर्म

तालुका प्रतिनिधी सुनिल हिंगे अल्लीपुर

होळी म्हटलं की रंगाची उधळण आपल्याला पाहायला मिळते. महाराष्ट्रात असं एकही गाव नाही जिथे रंगाची उधळण होत नसेल परंतु या सगळ्या परंपरेला फाटा देत. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचारानुसार अल्लिपुरात विणा रंगाची होळी व्हावी याकरिता येथील गुरुदेव सेवा मंडळाच्या वतीने रामधून काढून शांतता दिवस व रंग विना होळी निमित्त गावातील प्रमूख मार्गाने रॅली काढण्यात आली . यामध्ये नागरिकांना रंगाचे होणारे दुष्परिणाम आणि पाणी वाचवण्याचा संदेश या रॅलीच्या माध्यमातून देण्यात देण्यात आला आहे या रॅलीमध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे विचार नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी अनेक मान्यवर रॅलीच्या दरम्यान संदेश देत असतात.यावेळी गावातील गुरुदेव सेवा मंडळाचे श्रीराम साखरकर , योगेश वरभे , कैलास बाळबुधे , रामप्यारा कामडी , संदिप नरड , परेश सावरकर व इतर नागरिक मोठया संख्येने उपस्थीत होते

CLICK TO SHARE