जलालखेडा पोलिसांनी पेट्रोलिंग करतांना टाकली जुगार अड्ड्यावर धाड

क्राइम

प्रतिनिधी:साजिद पठाण नागपुर

जलालखेडा:दिनांक २६/०३/२०२४ रोजी जलालखेडा पोलीस स्टेशनचे ठाणेदार सपोनि/सी.बी.चौहान साहेब, PSI/मनोज शेंडे साहेब, पोलीस अंमलदार निलेश खेरडे,आशिष हिरूळकर, शिवदास सौंदळे,पोलीस स्टेशन परिसरात लोकसभा सार्वत्रिक निवडणुक – २०२४ संबंधाने पेट्रोलिंग करित असता गोपनिय माहीती मिळाली की उमठा येथे शेत शिवारात काही ईसम जुगार खेळ खेळत आहे अशा माहीती वरून सदर घटनास्थळी लपत छपत जावून धाड टाकली असता, घटनास्थळी १) रूपेश हरिधाउ गिरी वय २७ वर्ष रा. मेंढला २) त्रिरेन अशोकराव हाके वय २८ वर्ष रा.मेंढला.यांचे अंगझडतीमध्ये व झाडावर ठेवलेले ११३०/- रू. व घटनास्थळावरून ०२ मोटार सायकल किंमत. ९५,०००/- रूपये एकुण किंमत ९६,१३० /- रूपये चा माल पंचासमक्ष घटनास्ळावरून मिळुन आला.तसेच सदर घटनास्थळावरून फरार झालेले १) छत्रपती रामहरी चरपे २) विनोद तुकाराम सातपुते दोन्ही राहणार मेंडला व ईतर ०३ ते ०४ ईसम घटनास्थळावरून पळुन गेले. जुगार कायद्यांतर्गत गुन्हा नोंद करून पुढील तपास ठाणेदार सपोनि/सी.बी. चौहान साहेब, यांचे मार्गदशर्नात निलेश खेरडे व शिवदास सौंदळे हे करित आहे.सदरची कार्यवाही-मा. श्री. हर्ष.ए.पोद्दार (पोलीस अधिक्षक सा. (नागपूर ग्रा)मा.अपर पोलीस अधिक्षक सा.मा. उपविभागीय पोलीस अधि. सा. (काटोल वि.काटोल) यांचे मार्गदर्शनात जलालखेडा पोलीस स्टेशनचे ठाणेदार सपोनि/सी.बी. चौहान साहेब व त्यांच्या पथकाने केली.

CLICK TO SHARE