भारतीय बौद्ध महासभा तर्फे धम्म उपासिका प्रशीक्षण शिबिर संपन्न

धर्म

शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर

बल्लारपूर :भारतीय बौद्ध महासभा या वतीने संस्थेच्या माध्यमातून सम्पूर्ण भारतभर विधानवादी बौद्ध धम्माचा प्रसार आणि प्रचारचे करण्याचे कार्य सुरू आहे. बौध्द धम्म चे संस्कार टाकण्यकरीता, प्रशिक्षित करण्या करीता भारतीय बौद्ध महासभा २४ प्रकारचेे शिबिर राबविल्या जातात . यापैकी महिला करीता धम्म उपासिका प्रशीक्षण शिबिर हे फार महत्त्वपुर्ण शिबिर आहे.या शिबिराच्या माध्यमातून अंधश्रद्धा, कर्मकांड आणि धम्माचे प्रशिक्षण देऊन.महिलांना प्रशिक्षण करून एक सुज्ञ आणि बौद्ध जबाबदार व्याति म्हणून प्रशिक्षण दिले जाते बल्लारपूर शहरांमध्ये आम्रपाली बुद्ध विहार गोरक्षण वार्ड(सातखोली) येथे १७ ते २६ मार्च या कालावधीमध्ये दहा दिवसीय महिला धम्म उपासिका प्रशीक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आलेले होते. या शिबिराचा समारोपय कार्यक्रम २६ मार्च रोजी झाले. या शिबिराचे अध्यक्ष गायत्रीताई रामटेके अध्यक्ष भा बौ म बल्लारपुर शहर होत्या तर प्रमुख उपस्थितीमध्ये अशोक घोटेकर विदर्भ प्रदेश अध्यक्ष, नेताजी भरणे जिल्हाध्यक्ष, संदीप सोनोणे जिल्हा उपाध्यक्ष, सुजाता लाटकर जिल्हा उपाध्यक्ष महिला विभाग, सपना कुंभारे जिल्हा उपाध्यक्ष प्रचार पर्यटन विभाग, अशोक पेरकावार लेफ्टनट कर्नल, शेषराव सहारे केंद्रीय शिक्षक, किशोर तेलतुंबडे सरचिटणीस चंद्रपूर शहर, कृष्णक पेरकावर, प्रकाश तावाडे सरचिटणीस चंद्रपूर तालुका, पंचशीला वेले केंद्रीय शिक्षिका, संगीता शेंडे केंद्रीय शिक्षिका, कविता अलोने  केंद्रीय शिक्षिका, सुजाता नळे  केंद्रीय शिक्षिका, तसेच या शिबिराला दहा दिवस मार्गदर्शन करणाऱ्या  प्रगती मेश्राम केंद्रीय शिक्षिका उपस्थित होत्या.  प्रथमतः तथागत भगवान गौतम बुद्ध आणि बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पमाला अर्पण करून सामूहिक त्रिशरण पंचशील घेण्यात आले. यानंतर प्रास्ताविक खोब्रागडे यांनी केले. उपस्थित महिला प्रशिक्षणार्थी या सर्वांचे मनोगत घेण्यात आले. प्रत्येक महिला ज्या कधी माईक घेऊन बोलू शकत नव्हत्या, त्यांनी स्वतःचे मनोगत व्यक्त करत होत्या. आणि हे प्रशिक्षण आम्हाला किती उपयोगी आहे, आजपर्यंत आम्हाला अश्याप्रकारे कोणी प्रशिक्षण दिलेले नाही आणि यापुढे मी फक्त आणि फक्त बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली मातृसंस्था, भारतीय बौद्ध महासभे मध्येच कार्य करेल, या संस्थेला मदत करेल अशा पद्धतीचे मनोगत व्यक्त केले. या नंतर प्रमुख मान्यवर यानी मार्गदर्शन केले. शेवटी या सर्व प्रशिक्षनार्थी ना प्रमुख मान्यवार च्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले. या कार्यक्रम चे संचालन रामटेके यानी केले तर अनुकला वाघमारे केंद्रीय शिक्षिका यानी आभार व्यक्त केले. सरनत्य घेऊन या कार्यक्रमाची सांगता झाली.

CLICK TO SHARE