बल्लारपूर पेपर मिल कामगार मेळावा चे आयोजन

अन्य

शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर

बल्लारपूर : बल्लारपूर पेपर मिल मजदुर सभा ने कामगार मेळावा २०२४ चे आयोजन १६ एप्रिल रोजी येथील आयडियल ग्राउंड वर केले होते.या कामगार मेळावा च्या अध्यक्षस्थानी बल्लारपूर पेपर मिल मजदुर सभा चे अध्यक्ष माजी खासदार नरेशबाबु पुगलीया होते. त्यांनी कामगारांना मार्गदर्शन केले. त्यांनी कामगारांच्या हितासाठी आपली संघटना कामगार सोबत सैदव राहील. बल्लारपूर पेपर मिल कामगार संघटना व पेपर मिल प्रबंधक सोबत कामगाराच्या हिताचे निर्णय घेऊन पगारवाढ करण्यात आले होते.या वेळी मंचावर बल्लारपूर पेपर मिल सभेचे कार्याध्यक्ष तारासिंग कलसी, महासचिव वसंत मांढरे, सहसचिव वीरेंद्र आर्य, चंद्रकांत पोडे, कृष्णन नायर, ऍड. अविनाश ठावरी, चंद्रपूर चे माजी नगरसेवक अशोक नागपुरे, सुदर्शन पुली, सुभाष माथनकर,आशिष मोहता, गजानन दिवसे, रामदास वागदकर उपस्थित होते.कामगार मेळावा ला मनोज मोंडे,दिलीप डांगे, ठेकेदार बंडुभाऊ पडवेकर,मो.साबिरभाई ,आफताभ भाई, विलास कोंडावार सहित मोठ्या संख्येने कामगार उपस्थित होते.

CLICK TO SHARE