वरोरा तालुक्यातील येवती येथील रवींद्र धवस यांच्या शेतात वीज पडून दोन बैल ठार

अन्य

प्रतिनिधी:पवन ढोके तालुका प्रतिनिधी वरोरा

मौजा वरोरा तालुक्यातील मधेली जवड असलेल्या येवती या गावात आज दि 22-4-2024 ला सायंकाळी 4 वाजताच्या सुमारास जोरदार हवा आणि विजच्या कडकड्यात सोबत पावसाला अचानक सुरवात झाली अस्यातच सगडे शेतकरी मजूर लोक शेतात असताना पाऊस आल्या मुळे आडसा घेऊन बसले पण अचानक येवती गावातील एका शेतात रवींद्र धवस यांच्या शेतात बैल एका ठिकाणी बांधून असताना वीज पडून ते दोनी पण बैल ठार झाले, त्यामुळे रवींद्र धवस या शेतकरी चे मोठे नुकसान झाले आहे. आता शेतीच्या फरकाडी चे काम सुरु आहे अस्यातच त्या शेतकरी रवींद्र धवस वर मोठे आकस्मिथ संकट आले आहे, पहलेच शेतीमाला ला योग्य तो न मिडलेला भाव आणि आकस्मित पाऊस मुळे शेतकरी वर्गाचे मोठे नुकसान झालेले आहे, आणि एकदम अस्या अवकाळी पाऊस मुळे अनेक एकास्मित संकट शेतकरी वर्ग वर आलेले आहे अस्यातच वीज पडून येवती गावातील शेतकरी रवींद्र धवस यांचे बैल मेल्यामुळे जवाडपास एक लाख 50 हजाराचे नुकसान झालेले आहे, अस्यातच काही दिवसा पूर्वी लोकसभेच्या निवडणुका ह्या चंद्रपूर जिल्यात झालेल्या आहे आणि या निवडणुकीत दोनी पण उमेदवार ची अटीटतीची निवडणूक असताना दोनी पण उमेदवार त्यांनी आपल्या भाषणात शेतकरी वर्गाला आपण मोठी मदत करणार असे आश्वासन दिले होते आता त्यांना या रवींद्र धवस या शेतकरी ची मदत करण्याची गरज आहे, व त्याला योग्य ते नुकसान भरपायी त्यांनी स्वतः आणि शासणा कडून मिडवून द्यावी अशी विंनती शेतकरी करीत आहे. शेतकरी हा जगाचा पोशिंदा असतो तरी त्याच्यावर आभाळभर संकट आता बैला च्या वीज पडून मरण पावल्या मुळे मोठे संकट आलेले आहे, तरी शासनानी योग्य तो पंचनामा करून एक चांगली भरीव मदत त्या शेतकरी रवींद्र धवस ला देण्यात यावी अशी विनंती गावातील लोक करत आहे.

CLICK TO SHARE