046-हिंगणघाट मतदार संधामध्ये लोकसभा निवडणूकी करिता हिंगणघाट निवडणूक प्रशासन सज्ज

चुनाव

तालुका प्रतिनिधी सुनिल हिंगे अल्लिपुर

दिनांक 26/04/2024 रोजी होणाऱ्या लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 करिता 046- हिंगणघाट मतदार संघामध्ये संपूर्ण निवडणूक प्रशासन सज्य झालेले आहे. वर्धा लोकसभा अंतर्गत 046-हिंगणघाट मतदार संघामध्ये खालील प्रमाणे एकुण मतदार :- 2890761. पुरुष मतदार :- 1485142. महिला मतदार :- 1405623. नवमतदार (18-19 वयोगट) :- 39334. तरुण मतदार (20-29 वयोगट) :- 506475. एकुण मतदान केंद्र :- 341 (मुळ मतदान केंद्र 336 व सहायकारी मतदान केंद्र 5 )तसेच मा. निवडणूक आयोगाच्या निर्देशनुसार विशेष मतदान केंद्र स्थापन करण्यात येत असून त्यामध्ये 4 पर्दानशिन मतदान केंद्र , 2 युवा मतदान केंद्र,2 पिंक बुथ आणि 1 दिव्यांग मतदान केंद्र यांचा अंतर्भाव आहे. सदर निवडणुकीत एकुन 32 क्षेत्रीय अधिकारी काम पाहत असुन त्यांचे सोबत 1 पोलीस अधिकारी नेमण्यात आलेला आहे. तसेच मतदानकेंद्रनिहाय मतदान पथके तसेच पोलिस बंदोबस्त तयार असून दिनांक 25/4/2024 ला साहित्याचे वाटप सकाळी 8.00 वाजेपासुन सुरू करण्यात येणार आहे. मतदानाची दिवशी मतदान केंद्रावर EVM मध्ये काही बिघाड झाल्यास तात्काळ योग्य कार्यवाही करीता विशेष पथके तयार करण्यात आलेली आहेत. मतदान प्रक्रिया शांततेत आणि सुरळीत पार पडतील हे सुनिश्चित करण्याकरिता एकुन 170 मतदान केंद्रावर वेबकास्टींग साठी कॅमेरे लावण्यात आलेले असुन वेबकास्टींगचे थेट प्रक्षेपण मा. निवडणूक आयोग, तसेच मा. निवडणूक निर्णय अधिकारी, 08-वर्धा लोकसभा मतदार संघ तसेच सहा. निवडणूक निर्णय अधिकारी हिंगणघाट विधानसभा मतदारसंघ यांना नियंत्रण कक्षात दिसणार आहे. जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करून मतदान टक्का वाढविण्याचे दृष्टीकोणातुन तसेच युवा मतदार, महिला मतदार यांचे मतदान वाढावे याकरिता मतदार जनजागृती अंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात आले आहेत. तसेच मतदार केंद्रावरती मतदारांकरिता आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येत असून वाढत्या उष्णतेपासुन त्रास होऊ नये याकरिता शेडची उभारणी करण्यात आलेली आहे. प्रत्येक मतदानकेंद्रावर आरोग्य पथक तसेच मतदार सहायता कक्ष स्थापीत करण्यात येणार आहे. दिव्यांग व वयोवृध्द मतदारांना मतदान केंद्रात जाण्याकरिता व्हिलचेअर तसेच त्यांना मदत करण्याकरिता स्वयंसेवक यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. सर्व पात्र मतदारांना त्यांच्या मतदानाचा हक्क बजावणे सुलभ जावे याकरिता मतदानाचे दिवसी सार्वजनिक सुटटी जाहीर केलेली आहे. करिता सर्व मतदार यांना आव्हान करण्यात येते की, सर्व मतदारांनी मतदानाचा हक्क बजावण्याकरिता उत्सफुपर्तपणे सहभाग नोंदवावा तसेच लग्न समारंभ व इतर सण समारंभाप्रमाणेच लोकशाहिच्या या महोत्सवात सर्व मतदारांनी सामील होऊन आपले राष्ट्रीय कर्तव्य पार पाडावे असे आवाहन निवडणूक प्रशासनामार्फत करण्यात येत आहे.

CLICK TO SHARE