बल्लारपूर पोलिसांनी पकडला साडेचार लाखाचा सुगंधीत तंबाखू

क्राइम

शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर

बल्लारपूर : बल्लारपूर बसस्थानकात नागपूरहून आसिफाबादकडे जाणारा सुगंधित तंबाखू पोलिसांनी एका आरोपीसह जप्त केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बल्लारपूर बसस्थानक मध्ये सायंकाळी ६ वाजता अवैध सुगंधीत तंबाखूची तस्करी होत असल्याची माहितीच्या पोलीसांना मिळाली. त्या वेळी आधारे पोलिसांनी सापळा रचून एका आरोपीकडून ३ किलो चे १०० नग सिल्व्हर पेपर लावून सिलबंद पॉकेट ३०० किलो तंबाखू असा एकूण साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त केला. सदर आरोपी हा कुरिअर बॉय असून त्याचा मालक कोण आहे. याचा तपास पोलीस करत आहे.सदर कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक रीना जनबंधू , उपविभागीय पोलीस अधिकारी दीपक साखरे यांच्या मार्गदर्शनाखाली बल्लारपूरचे पोलीस निरीक्षक आसिफराजा शेख यांच्या नेतृत्वात सहायक पोलीस निरीक्षक दीपक काँक्रिडवार, पोलीस उपनिरीक्षक विक्की लोखंडे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गजानन डोईफोडे, पोहवा रणविजयसिंग ठाकूर, पोहवा संतोष दांडेवार, पोहवा सत्यवान कोटनाके, पोशी शेखर माथनकर, पोशी विलास खरात, पोशी विशिष्ठ रंगारी, पोशी श्रीनिवास वाभिटकर, चापोहवा परमवीर यादव सह आदींनी केले.

CLICK TO SHARE